Kiara Advani and sidharth malhotra image  Saam Tv
मनोरंजन बातम्या

जीव गुंतला...! सिद्धार्थ-कियाराचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल, एकमेकांमध्ये...

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​ही जोडी खूप लोकांना आवडते. काही दिवसांपूर्वी हे दोघे एका अवॉर्ड शोमध्ये एकत्र दिसले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड अभिनेता (actor) सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) ​​आणि अभिनेत्री (actress) कियारा अडवाणी (Kiara Advani) त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात होते. मधल्या काळात दोघांची वाट वेगळी झाल्याचं बोललं जात होतं. मात्र, निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या बर्थडे पार्टीत हे दोघे एकत्र दिसले आणि कसल्या चर्चा अन् कसलं काय, सगळंच बाजूला पडलं. या दोघांवर पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा खिळल्या.

पार्टीनंतर त्यांच्या दोघांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं दिसलं. अलीकडेच हे दोघे पुन्हा एका अॅवॉर्ड शोमध्ये एकत्र दिसले. दोघांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांनाही खूप आनंद झाला असावा. आता अवॉर्ड शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात या दोघांचा जणू एकमेकांमध्ये 'जीव रंगला' असंच दिसत होतं. सोहळ्यात या दोघांचं लक्षच नव्हतं. ते दोघे आजूबाजूला काय चाललंय हे सगळं विसरून एकमेकांमध्ये हरवल्याचं पाहायला मिळालं. मग काय, चर्चा तर होणारच!

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​ही जोडी प्रेक्षकांना भावली आहे. दोघेही खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत, अशी चर्चा आहे. पण आजपर्यंत त्यांनी या नात्याची उघड कबुली दिलेली नाही. नेमकं खरं काय आणि खोटं काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलेला आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघे एका अवॉर्ड शोमध्ये एकत्र दिसले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहेत.

या जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यात कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांच्या बाजूला बसून गप्पा मारताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर स्टेजवर पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहे. पण एकमेकांमध्ये हरवलेल्या कियारा आणि सिद्धार्थ यांना आजूबाजूला काय चाललंय याचं काही पडलेलंच नव्हतं. ते दोघे गप्पांमध्ये हरवून गेले होते. त्यांचा हा व्हिडिओ बघून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

कियारा आणि सिद्धार्थच्या ब्रेकअपमुळे निराश झालेले त्यांचे चाहते दोघांना सोबत बघून खूप खूश आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते या दोघांसाठी कपल गोल्सचा हॅशटॅग वापरत आहेत. या दोघांच्या या व्हिडिओवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. 'कोण म्हणत होते की या दोघांचे ब्रेकअप झाले आहे?' असा प्रश्न एका चाहत्यानं उपस्थित केला. 'या दोघांना बघून कोणलाही या दोघांच्याच प्रेमात पडावेसे वाटेल,' असं एका यूजरनं म्हटलं आहे. 'हे प्रेम नाही तर, अजून काय?' अशी कमेंट एका चाहत्यानं केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter Duplication: सत्ताधारी आमदाराच्या पत्नीचं मतदार यादीत दोनदा नाव|VIDEO

Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशभक्तांना टोलमाफी; पास कसा आणि कुठे मिळणार?

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज, मेट्रो प्रवास करत घ्या बाप्पाचं दर्शन; गणेशोत्सवानिमित्त नवं वेळापत्रक जारी

Money In Dreams: स्वप्नात पैसे दिसणे शुभ की अशुभ?

Maharashtra Live News Update: कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; नेवासा तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT