मुंबई : लोकप्रिय फॅमिली कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) यामधील लोकप्रिय पात्र असलेली दयाबेन (दिशा वकानी) ही गेल्या चार वर्षे शोमध्ये दिसली नव्हती. काही कारणात्सव दिशा वकाणी यांनी शो सोडला होता. तेव्हापासून प्रेक्षक 'दयाबेन'ला शोमध्ये मिस करत होते. पण, अखेर आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. कारण शो च्या निर्मात्यांनी नवीन 'दयाबेन' मिळाली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री राखी विजन-टंडन (Rakhi Vijan) या आता शोमध्ये 'दयाबेन'चं पात्र निभावणार आहे. यामुळे प्रेक्षकांना नवी दयाबेन आणि जेठालाल याला नव्या स्वरुपातली दया मिळणार आहे. (Who is new Dayaben? Rakhi Vijan to replace Disha Vakani on 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah'?)
हे देखील पाहा -
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) या टीव्ही सिटकॉमची गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. प्रेक्षकांच्या सर्वात आवडत्या पात्रांपैकी एक दयाबेन चार वर्षांनंतर या शोमध्ये दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्री राखी विजन आता दयाबेनची जागा घेणार आहे. राखी विजन-टंडन या ९० च्या दशकातील शो 'हम पांच'मधील तिचे लोकप्रिय पात्र स्वीटी माथूरसाठी प्रसिद्ध आहे, तिला आता दयाबेनच्या भूमिकेत सामील करण्यात आले आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही सिटकॉमचे निर्माता असित कुमार मोदी यांनी अलीकडेच मीडियाला माहिती दिली होती की, दयाबेन हे प्रसिद्ध पात्र शोमध्ये परत येईल. परंतु दयाबेनची भूमिका करणारी दिशा वकाणीच्या पुनरागमनाची पुष्टी करू शकत नाही. शोचे दर्शक त्यांच्या आवडत्या दिशा वकानीला मिस करत आहेत. अभिनेत्री दिशा वकाणी नेहमीच सर्वांच्या आठवणींत राहणार आहे. जुनी दयाबेन दिशा वकाणी हिचे 'हे माँ माताजी' पासून ते 'टप्पू के पापा' पर्यंत सिग्नेचर डायलॉग चाहत्यांनी डोक्यावर घेतले. दिशा वाकाणी यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये प्रसूतीसाठी सुट्टी घेतली आणि त्यानंतर त्या शो मध्ये परत आल्याच नाही.
एका खात्रीलायक सुत्राच्या माहितीनुसार "दयाबेनच्या भूमिकेसाठी राखी विजानशी संपर्क साधण्यात आला आहे. राखी ही सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची कॉमिक टाइमिंग चांगली आहे." राखीने याआधी 'देख भाई देख', 'बनेगी अपनी बात', 'नागिन ४' यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. तिने 'गोलमाल रिटर्न्स' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. तसेच 'बिग बॉस २' मध्येही ती सहभागी झाली होती.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.