मनोरंजन बातम्या

Sangram And Khushboo Lovestroy: 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'; संग्राम- खुशबूची युनिक लव्हस्टोरी तुम्हाला माहिताये का?

Sangram Salvi And Khushboo Tawde Lovestroy: मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू तावडे सध्या त्याच्या वैयक्तिक आनंदी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Manasvi Choudhary

मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू तावडे सध्या त्याच्या वैयक्तिक आनंदी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या कपलला कन्यारत्न झाली आहे. पहिला मुलगा आता मुलगी झाल्याने दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अशातच आज आपण जाणून घेऊया संग्राम आणि खुशबू यांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली.

खुशबू आणि संग्रामची लव्हस्टोरी युनिक आहे. संग्राम आणि खुशबू यांची पहिली भेट देवयानी या मालिकेच्या सेटवर झाली. याच मालिकेच्या सेटवर दोघेही एकेमेकांना ओळखू लागले. मात्र खुशबूला संग्राममध्ये अॅटीट्यूड आहे असं वाटायचं. यामुळे ती बोलायला घाबरत होती. मात्र मालिकेच्या सेटवर संग्राम खुशबूच्या प्रेमात पडला.मालिकेत खुशबूची भूमिका फार कमी वेळासाठी होती. यानंतर मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर या दोघांच्या प्रेमाचे वारे वाहू लागले. यानंतर दोघांना एकमेकांविषयी प्रेम जाणवले.

संग्रामकडे खुशबूचा नंबर देखील नव्हता.एका कार्यक्रमानिमित्त दोघांनी एकमेकांसोबत फोटो काढले. हे फोटो घेण्यासाठी त्याने मेकअप आर्टिस्टकडून नंबर मिळवला. त्यानंतर दोघे एकमेकांशी बोलू लागले. एकेदिवशी संग्रामने तिला कॅफेत भेटायला बोलवले. यानंतर संग्रामने खुशबूला प्रपोज केलं मात्र हे प्रपोज थोडं युनिक होतं. त्याने तिला आय लव्ह यू बोलून नाही तर थेट माझ्यासोबत तुला म्हातारं व्हायला आवडेल का असं विचारलं. खुशबूनेही संग्रामला होकार देत प्रेमाच्या नात्याला सुरूवात केली. ५ मार्च २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नांच्या ३ वर्षानी २ नोव्हेंबर २०२१ मध्ये या दोघांनी पहिला मुलगा झाला त्याचे नाव राघव आहे. नुकतंच या दोघांना एक मुलगी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT