Sheezan Khan Eliminate Khatron Ke Khiladi Season 13 Saam Tv
मनोरंजन बातम्या

KKK13 Sheezan Khan Evicted: ‘खतरों के खिलाडी'मध्ये १३ पैकी ५ स्पर्धक घरी, डेझी शाहनंतर आणखी एकजण बाहेर

Sheezan Khan Eliminate Khatron Ke Khiladi Season 13: लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये डेझी शाह नंतर आणखी एका स्पर्धकाला शोमधून बाहेर पडावे लागले आहे.

Chetan Bodke

KKK13 Sheezan Khan Eliminate: सर्वाधिक लोकप्रिय शो असलेला ‘खतरों के खिलाडी १३’ ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. शूटिंग सुरु झाल्यापासून अनेक स्पर्धकांना शूटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. त्यातील काही स्पर्धकांनी घरचा रस्ता पकडला तर काहींनी उपचार घेऊन शो मध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वी शिव ठाकरे या सीझनचा पहिला फायनलिस्ट असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शोसंदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे.

या शो मधून अनेक स्पर्धक बाहेर पड आहेत. काही दिवसांपूर्वी डेझी शाह बाहेर निघाली होती, त्यानंतर आता ‘अली बाबा: दास्तान ए काबूल’ फेम शिजान खान शो मधून बाहेर पडल्याची माहिती मिळाली आहे. शिजान या शो मधला नववा स्पर्धक होता. आता एकूण आठ स्पर्धक आहेत. यामध्ये अर्चना गौतम, शिव ठाकरे, अर्जित तनेजा, डीनो जेम्स, ऐश्वर्या शर्मा, सौंदस मौफकीर, नायरा बॅनर्जी आणि रश्मित कौर या स्पर्धकांचा समावेश आहे.

‘खतरों के खिलाडी १३’ या शोमध्ये बरेच खेळाडू घराबाहेर गेले आहेत. यामध्ये रुही चतुर्वेदी, अंजली आनंद, डेझी शाह, रोहित रॉय या स्पर्धकांच्या नावाचा समावेश आहे. नुकताच या शोमधून शीजान खान देखील बाहेर गेल्याच्या सध्या चर्चा होत आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार, शीजान खानला शोमधून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची शोमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाल्यापासून अनेक वाद झाले होते. टुनिशा शर्माच्या आईने देखील रिॲलिटी शो मध्ये त्याची एन्ट्री होऊ नये यासाठी विरोध केला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शीझान खान एलिमिनेशन राऊंडमध्ये काही स्टंट पूर्ण न करू शकल्यामुळे तो शोमधून बाहेर पडला आहे. शीजान खान सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या स्पर्धकांमधील असल्याने त्याच्या अचानक एक्झिटने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हा रिॲलिटी शो येत्या १५ जुलैपासून कलर्स टिव्हीवर प्रसारित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT