Khatron Ke Khiladi  Instagram/ @itsrohitshetty
मनोरंजन बातम्या

'बिग बॉस 16'मधील 'हे' स्पर्धक 'Khatron Ke Khiladi' मध्ये दिसणार, 'या' नावांची होतेय चर्चा

'खतरों के खिलाडी 13'साठी कोण कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Chetan Bodke

Khatron Ke Khiladi 13: 'बिग बॉस 16' संपून अवघे काही दिवसच झाले असून आता नव्या शो ची चाहूल प्रेक्षकांना सध्या लागली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी 'बिग बॉस 16'च्या विकेंडला जेव्हा आला होता, त्यावेळी त्याने शिवला 'खतरों के खिलाडी 13'साठी विचारलं होतं आणि तेव्हापासूनच त्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली. त्यासोबतच आता कंगनाच्या 'लॉक अप'या शोमध्ये देखील कोण कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टीने निर्मात्यांसोबत स्पर्धकांची निवड करीत आहे. काही स्पर्धकांना आधीच ऑफरही देण्यात आली आहे. सध्या तरी एकूण ६ स्पर्धकांच्या नावाची चर्चा होत आहे. 'खतरों के खिलाडी 13' साठी शालीन भानोत, शिव ठाकरे, अर्चना गौतम, मुनावर फारुकी, सुंबुल तौकीर खान, नकुल मेहता या स्पर्धकांची नावं आहेत.

रोहितने 'बिग बॉस 16'च्या घरात सर्व स्पर्धकांना काही स्टंट्स करायला सांगितले होते. त्यात शालिन भानोतची निलवड करण्यात आली होती. रोहितने शालिनला त्याच्या आगामी शोसाठी ऑफरही केले, पण त्याने ती ऑफर नाकारली. त्याने एकता कपूरचा नवीन शो 'बेकाबू' साइन केला आहे.

मात्र, रोहित शेट्टीने शालीन भानोतला या ऑफरवर पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितले असल्याचे सांगण्यात येत आहे. कदाचित शालीन 'खतरों के खिलाडी 13' मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. शालिनने रोहित शेट्टीची ऑफर नाकारली कारण त्याला कीटकांची भीती वाटते.

बिग बॉसच्या घरात रोहित शेट्टीने केलेल्या स्टंटमध्ये शिव ठाकरेंचा अवघ्या काही सेकंदांनी पराभव झाला. पण याचा अर्थ असा नाही की, रोहित शेट्टीला शिवचा खेळ आवडला नाही. रोहित शेट्टीने शिव ठाकरेच्या कामगिरीचे कौतुक केले. खुद्द शिव ठाकरेही 'खतरों के खिलाडी 13' चा भाग होण्याचे स्वप्न पाहत आहेत. 13व्या सीझनसाठी निर्मात्यांनी शिव ठाकरे यांच्याशीही संपर्क साधला असून त्यांची सध्या निर्मात्यांशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

'खतरों के खिलाडी 13'साठी अर्चना गौतमचे नावही समोर येत आहे. जर रोहित शेट्टीने अर्चनाला शोमध्ये साइन केले तर केवळ मनोरंजनाचा एक मजबूत डोस नाही तर अर्चनाची एक धाडसी बाजू देखील दिसेल. अर्चना गौतमनेही सांगितले की, तिला स्टंट करायला मजा येते. तिला सरडे वगळता कोणत्याही कीटकाची किंवा पाण्याची भीती वाटत नाही. 'लॉकअप सीझन 2'साठी अर्चनाचे नावही झळकले होते. पण रिपोर्ट्सनुसार, अर्चनाने सध्या या शोचा भाग होण्यास नकार दिला आहे.

सुंबुल तौकीर खानला 'बिग बॉस 16' मधून अप्रतिम लोकप्रियता मिळाली आहे. सुंबुलला 'खतरों के खिलाडी 13' ची ऑफर मिळाल्याची चर्चा आहे.

मुनवर फारुकी यावेळी 'खतरों के खिलाडी 13'मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. मुनवर फारुकी हा शोच्या 12व्या सीझनसाठी जवळपास फायनल होता. पण घटनास्थळीच परिस्थिती बिघडली आणि तो मागे पडला. पण यावेळी बातमी आहे की मुनवर फारुकी 'खतरों के खिलाडी 13' मध्ये दिसणार आहे.

'खतरों के खिलाडी 13'साठी अभिनेता नकुल मेहतालाही अप्रोच करण्यात आल्याचे वृत्त आहे. नकुल मेहताचा 'बडे अच्छे लगते हैं 2' हा शो नुकताच संपला आहे. आत्तापर्यंत चाहत्यांनी नकुल मेहताची गंभीर आणि रोमँटिक बाजू पडद्यावर पाहिली आहे. त्याने 'खतरों के खिलाडी 13' मध्ये धाडसी स्टाईलही पाहायला मिळेल.

मिळालेल्या माहितीनुसार, 'खतरों के खिलाडी 13' या वर्षी जुलै किंवा ऑगस्टमध्ये सुरू होऊ शकतो. यावेळी अर्जेंटिनामध्ये हा शो चित्रित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेवटच्या सीझनचा तुषार कालिया विनर होता, तर मिस्टर फैसू उपविजेता होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Mumbai News: मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, भीतीपोटी पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडलं

SCROLL FOR NEXT