Aishwarya Sharma Gets Attacked During Stunt In Khatron Ke Khiladi Season 13 Saam TV
मनोरंजन बातम्या

Khatron Ke Khiladi Season 13: 'खतरों के खिलाड़ी 13' मधील अभिनेत्रीवर कुत्र्याचा हल्ला; जखमी ऐश्वर्या शर्माने शेअर केले फोटो

Aishwarya Sharma Share Photo: ऐश्वर्याने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याच्या हातावर अनेक जखमा आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aishwarya Sharma Get Attacked During Stunt:

टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा सध्या रोहित शेट्टीच्या स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 13' मध्ये दिसत आहे. ऐश्वर्याने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याच्या हातावर अनेक जखमा आहेत. तिचा हात निळा पडला आहे. तसेच तिने एका कुत्र्याचा फोटोही पोस्ट केला आहे. या सगळ्याचा नेमका अर्थ काय चला जाणून घेऊया.

'खतरों के खिलाडी 13' चा एक प्रोमो रिलीज झाला. यामध्ये ऐश्वर्या शर्माने सेफ्टी सूट घातला आहे. समुद्रकिनाऱ्यावर वाळूमध्ये धावताना दिसत आहे आणि तिच्या मागे कुत्र्याने सोडण्यात आला आहे.

ऐश्वर्या धावत धावत पडते. ऐश्वर्याच्या मागे सोडलेला कुत्रा तिच्या अंगावर जातो. ऐश्वर्या जोरजोरात ओरडते. हा एक स्टंट आहे. जो ऐश्वर्या करत होती. असा स्टंट 'खतरों के खिलाडी'च्या इतिहासात आजवर झालेला नाही. 26 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये हा स्टंट पहायला मिळणार आहे. ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये फोटोवर आर्ट आणि आर्टिस्ट असे कॅप्शन लिहिले आहे. (Latest Entertainment News)

ऐश्वर्या शर्माने 6 फोटोंचा कोलाज शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही हाताच्या वरच्या बाजू निळा पडलेला दिसत आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे हा प्रकार घडला. त्याचबरोबर कुत्र्याला तिने आर्टिस्ट म्हटले आहे.

ऐश्वर्या शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले - डॉग्गो, इतके सुंदर पेंटिंग केल्याबद्दल धन्यवाद. फोटो खुप भयानक आहेत. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऐश्वर्याचे पती नील भट्ट यांची कमेंट केली आहे. त्यांनी लिहिले आहे, 'तुम तो सबकी दिलवाली हो ऐश्वर्या शर्मा.'

'गुम है किसी के प्यार में' अभिनेता विहान वर्माने लिहिले आहे, 'तू माझे नाव बदलून हृतिक रोशन केले आहेस. मला तुझा अभिमान आहे.' तारक मेहता, सचिन श्रॉफने लिहिले आहे, 'अरे... स्टँग गर्ल.' चाहत्यांनीही ऐश्वर्याच्या धाडसाचे कौतुक करत म्हटले आहे,'तू खतरों की खिलाडी आहेस.' काहींनी रोहित शेट्टी आणि स्पर्धकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकांची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश, बिगूल कधी वाजणार? VIDEO

Waterfalls near Neral: गर्दी कमी आणि लांब जाण्याचीही गरज नाही! नेरळ-माथेरान जवळ आहेत 'हे' लपलेले धबधबे

Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT