HBD Madhur Bhandarkar: सिग्नलवर च्युइंगम विकणार लहान मुलगा ते प्रसिद्ध दिग्दर्शक, जाणून घ्या मधुर भांडारकर यांचा जीवनप्रवास

Madhur Bhandarkar's Birthday: 'चांदनी बार' हा चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला.
Madhur Bhandarkar Birthday Special
Madhur Bhandarkar Birthday SpecialSaam TV
Published On

Madhur Bhandarkar Birthday Special:

आज त्यांची गणना बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांमध्ये केली जाते, परंतु एक काळ असा होता जेव्हा ते सिग्नलवर च्युइंगम विकायचे. त्यांनी कॅसेटच्या दुकानातही काम केले, त्यानंतर फिल्मी दुनियेत नशीब आजमावले आणि सर्वजण त्यांचे फॅन झाले.

ही गोष्ट आहे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची ओळख. मधुर भांडारकर यांचा जन्म २६ ऑगस्ट १९६८ रोजी मुंबईत झाला होता. आज त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊया मधुरच्या आयुष्यातील संघर्ष.

Madhur Bhandarkar Birthday Special
Sanjay Varma Death: 'कोई मिल गया' चित्रपटाचे एडिटर संजय वर्मा यांचं निधन; काही तासांपूर्वीच मिळाला होता नॅशनल अवॉर्ड

मधुर भांडारकर यांचे बालपण

मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या मधुर भांडारकर यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांना सहावीतच शिक्षण सोडावे लागले. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी ट्रॅफिक सिग्नलवर च्युईंगम देखील विकले. मात्र, ते नेहमीच काही ना काही शिकत राहिले.

कॅसेटमधून चित्रपटांचे बारकावे शिकले

जीवनातील कठीण काळात मधुर भांडारकरने कॅसेटच्या दुकानातही काम केले. त्या काळात त्यांनी खूप कॅसेट्स पाहिल्या. हळूहळू मधुरने स्वतः कॅसेटचा व्यवसाय सुरू केला आणि 1700 कॅसेट जमा केल्या. तसेच चित्रपट निर्मितीतील बारकावे समजू घेतले. त्या काळात त्यांनी अनेक छोट्या दिग्दर्शकांसोबत काम केले. ज्यासाठी त्यांना एक हजार रुपये मानधन मिळू लागले. त्यांनी राम गोपाल वर्मा यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. (Latest Entertainment News)

पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला

लोकांच्या सल्ल्याने मधुर भांडारकरने 'त्रिशक्ती' हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. मात्र, तो चित्रपट फ्लॉप झाला, त्यामुळे लोक मधुर भंडारकरला टाळू लागले. मात्र, मधुर यांनी हिंमत न हारता काम सुरु ठेवलं.

यानंतर मधुर भांडारकरने मुंबईच्या गल्लीबोळातील आणि रस्त्यांवरील अनुभवाचा वापर करून 'चांदनी बार' हा चित्रपट बनवला, ज्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. मधुर भांडारकर यांनी ट्रॅफिक सिग्नल, पेज 3 आणि फॅशन सारखे चित्रपट केले, त्यानंतर ते प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com