Khalid Ka Shivaji Controversy: saam tv
मनोरंजन बातम्या

Khalid Ka Shivaji: ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी येणार? राज्य सरकारचं केंद्राला पत्र

Khalid Ka Shivaji Controversy: राज मोरे दिग्दर्शित 'खालिद का शिवाजी' या मराठी चित्रपटाला हिंदू महासंघाकडून जोरदार विरोध होत आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्राला पत्र लिहून चित्रपटाची पुर्नतपासणी करण्याची मागणी केलीय.

Bharat Jadhav

  • ‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटावर हिंदू महासंघाने आक्षेप घेतला आहे.

  • राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहून चित्रपटाच्या पुर्नतपासणीची मागणी केली आहे.

  • हा चित्रपट ८ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता, परंतु आता त्यावर बंदी येणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.

  • राज्य पुरस्कार समारंभातही या चित्रपटाविरोधात निदर्शने करण्यात आली होती.

’खालिद का शिवाजी’ हा चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग खडत्तर झालाय. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी हिंदू महासंघाकडून होत आहे. दरम्यान 'खालिद का शिवाजी हा चित्रपट येत्या आठ ऑगस्ट रोजी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण चित्रपट प्रदर्शित होणार की नाही याबाबत शंका आहे. राज मोरे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.

हिंदू महासंघाकडून या चित्रपटावर आक्षेप घेण्यात आलाय. आता राज्य सरकारनं ’ या चित्रपटासंदर्भात केंद्राला एक पत्र पाठवलंय. या पत्रामध्ये राज्य सरकारकडून केंद्राकडे पुर्नतपासणी करण्याची विनंती करण्यात आलीय. राज्य पुरस्कार समारंभात या चित्रपटाविरोधात निदर्शने झाली होती.

चित्रपट प्रदर्शित झाला तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती राज्य सरकारकडून या पत्रात व्यक्त करण्यात आलीय. संस्कृतिक विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्याकडून माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रालयानं थेट हस्तक्षेप करत चित्रपटाचे प्रदर्शन तात्पुरते थांबवण्याची शिफारस या पत्रात करण्यात आलीय.

चित्रपटाला हिंदू महासंघाकडून विरोध करण्यात आलाय.चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचं आरोप हिंदू महासंघानं केलाय. त्यामुळे या चित्रपटाविरोधात हिंदू महासंघानं आक्रमक भूमिका घेतलीय.

हिंदू महासंघाने चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केलीय. त्यांनी यासाठी सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपट निर्मात्याला पत्र पाठवले असून, जर बंदी घातली नाही, तर ज्या ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होईल तिथे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजेत; मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य चर्चेत|VIDEO

Money Astro Tips: पैसा हातात राहत नाही? तुमच्या या सवयी ठरतील कारणीभूत

Maharashtra Live News Update: सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT