Aisi Jannat Song: 'तू मिला तो मिली ऐसी जन्नत मुझे...'; कॉलेजमधल्या प्रेमाची आठवण करुन देणारं नव गाणं प्रदर्शित

Aisi Jannat New Song: टी-सिरीजकडून नुकतंच 'ऐसी जन्नत' हे नवं रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, हे गाणं सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Aisi Jannat Song
Aisi Jannat SongSaam Tv
Published On

Aisi Jannat Song: टी-सिरीजकडून नुकतंच 'ऐसी जन्नत' हे नवं रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, ते सध्या सोशल मीडियावर आणि संगीत प्रेमींमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे. मनाला भिडणाऱ्या सूरांनी सजलेलं हे गाणं एका निरागस प्रेमाची कहाणी आहे. हे गाणं लक्षय कपूरने त्याच्या सुरेल आवाजात गायले आहे. गाण्याचं संगीत मीत ब्रदर्स यांनी दिलं असून गीत लेखन यंगवीर यांचे आहे.

व्हिडीओमध्ये अभिनेत्री सोनल चौहान झळकते आहे, जिला आजही अनेक प्रेक्षक तिच्या ‘जन्नत’ चित्रपटातील पदार्पणामुळे ओळखतात. ‘ऐसी जन्नत’मध्ये ती लक्षय कपूरसोबत एक फ्रेश आणि रोमॅन्टिक केमिस्ट्रीत दिसत आहे. त्यांच्या एकत्रित अभिनयातून प्रेमाचे साधे, निरागस क्षण जिवंत होतात.

Aisi Jannat Song
Box Office Collection: 'महावतार नरसिंह' आणि 'सैयारा'मध्ये कांटे की टक्कर; जाणून घ्या 'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २'ची कमाई

सोनल चौहान म्हणाली, “जेव्हा मी पहिल्यांदा ‘ऐसी जन्नत’ ऐकलं, तेव्हा त्याची माला त्या गाण्याचं संगीत भावलं. लक्षयसोबत काम करणं खूप आनंददायक होतं. त्याच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे. टी-सिरीजसोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली, हे देखील विशेष आहे.”

Aisi Jannat Song
The Trial 2: मी किती वेळा कमबॅक करू? 'द ट्रायल 2' ची घोषणा करताना का चिडली काजोल?

लक्षय कपूरने देखील या गाण्याविषयी भावना व्यक्त करत म्हणाला, “हे गाणं माझ्या मनाच्या खूप जवळचं आहे. जुन्या काळातल्या शुद्ध प्रेमाची ही आठवण आहे. सोनलसोबत काम केल्यामुळे संपूर्ण व्हिडीओला एक भावनिक स्पर्श मिळाला. मी टी-सिरीज आणि भूषण कुमार सरांचा आभारी आहे.” मीत ब्रदर्सचं संगीत, यंगवीर यांचे हृदयस्पर्शी शब्द, आणि सोनल-लक्षय यांची केमिस्ट्री यामुळे ‘ऐसी जन्नत’ हे गाणं प्रेमाच्या चाहत्यांसाठी एक उत्तम अनुभव ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com