Tollywood Celebrity Meets Pm Modi Instagram/ @ aiyyoshraddha
मनोरंजन बातम्या

PM Modi Meets Kannada Actors: पंतप्रधान मोदींची दाक्षिणात्य चित्रपटांतील सेलिब्रिटींना ग्रेट-भेट, भेटीत केली महत्वाच्या विषयांवर चर्चा

काल कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज सेलिब्रिटींना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटले.

Chetan Bodke

PM Modi Meets Kannada Actors: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केजीएफ स्टार यश आणि कांतारा फेम अभिनेता ऋषभ शेट्टी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी काल बेंगळुरू येथे एरो इंडिया 2023 मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज सेलिब्रिटींना भेटले. भाजपच्या कर्नाटक युनिटने बैठकीचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

अनेक सेलिब्रिटींनी यावेळी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. भेटीचे अनेक फोटोज सध्या सोशल मीडियावर कर्नाटक भाजपने शेअर करत सांगितले की, पंतप्रधानांनी सेलिब्रिटींसोबत संस्कृती, नवीन भारत आणि कर्नाटक राज्याच्या प्रगतीविषयी चर्चा केली. ऋषभ शेट्टीसोबत इंडस्ट्रीतील इतर अनेक सेलिब्रिटी होते.

KGF 2 हा चित्रपट कन्नड उद्योगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. याने जगभरात सुमारे 1250 कोटींची घसघशीत कमाई केली आहे. तर दुसरीकडे, कमी बजेट असलेल्या कांतारानेही प्रदर्शनानंतर जगभरात आपला ठसा उमटवला. दमदार ॲक्शन, दमदार अभिनय आणि उत्तम कथा असलेल्या या चित्रपटाने जगभरात ४०० कोटींची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटांनी कन्नड चित्रपटसृष्टीला जगभरात ओळख निर्माण करुन दिली.

पंतप्रधान मोदींची यावेळी दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री श्रद्धा श्रीनाथने देखील भेट घेतली. श्रद्धा एक प्रसिद्ध इंस्टाग्राम एन्फ्लुएंसर आहे. श्रद्धाने पंतप्रधानांच्या भेटीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटो पोस्ट करत श्रद्धा म्हणते, “होय, मी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटले. मला भेटल्यावर त्यांनी पहिला शब्द उच्चारला तो 'अय्यो'.” पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर श्रद्धा श्रीनाथने तिच्या भावना शेअर केल्या आहेत.

यावेळी पंतप्रधान मोदींनी दिवंगत कन्नड अभिनेता पुनित राजकुमार यांची पत्नी अश्विनी राजकुमार यांचीही भेट घेतली. गेल्या आठवड्यातच अश्विनीने पती पुनित राजूकमार यांचे नाव रस्त्याला दिल्याबद्दल कर्नाटक सरकारचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT