Ketaki Chitale On Maratha Reservation Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ketaki Chitale On Maratha Reservation: ‘एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?’, मराठा समाजाच्या आंदोलनावरील पोस्टनंतर केतकी चितळे ट्रोल

Ketaki Chitale News: केतकी चितळेने मराठा समाजाच्या आंदोलनावर एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला आहे. त्या प्रश्नामुळे अभिनेत्री प्रचंड ट्रोल होतोय.

Chetan Bodke

Ketaki Chitale On Maratha Reservation

सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समजाला आरक्षण (Maratha Arakshan) मिळावं यासाठी राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने, जाळपोळ, रास्तोरोको केले जात आहेत.

मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.

अनेक राजकीय नेत्यांपासून मराठी सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा मिळतोय. मात्र केतकी चितळेने एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला आहे. त्या प्रश्नामुळे अभिनेत्री प्रचंड ट्रोल होतोय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे. आतापर्यंत अभिनेता किरण माने, रितेश देशमुख, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र अभिनेत्री केतकी चितळेने एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला. केतकीने सोशल मीडियावर एक एसटी फोडतानाचा व्हिडिओ शेअर करत ‘एस.टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा??’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नावरुन तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले आहे. (Social Media)

केतकी चितळे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणते, “एस.टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा??! इंडियाला Uniform Civil Code (UCC) हवा असेल, पण भारताला UniformCivilLaw, तसेच UniformCriminalLaw ची गरज आहे.।जय हिंद।। …।।वंदेमातरम्।। …भारत माता की जय” असे म्हणत केतकीने नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या नाराजीमुळे केतकी प्रचंड ट्रोल होत आहे. केतकीच्या या विचारांचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तिने केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Actress)

अनेकांनी केतकीला वातावरण खराब आहे. अशा पोस्ट करू नको, शांत राहा असा सुद्धा सल्ला दिलाय. पण तुम्ही माझ्या पोस्टकडे दुर्लक्ष करू शकता असा सल्लाच तिने नेटकऱ्यांना दिलाय. अशा प्रकारे ट्रोल होण्याची ही केतकीची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी हिंदीत बोलण्यावरून, युनिफॉर्म सिव्हील कोड सारख्या पोस्टवरून वाद झाला होता. शरद पवार यांच्यावर अर्वाच्य भाषेतली कविता शेअर केल्यामुळे केतकीला तुरुंगातही जावं लागलं होतं. पुढे तुरुंगातून ती बाहेरही आली. पण केतकी अनेक विषयांवर आपली मतं मांडत असते. त्यामुळे अनेक वाद निर्माण होतात. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT