Dalljiet Kaur And Nikhil Patel Divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikhil Patel And Daljeet Kaur News : निखिल पटेलच्या कायदेशीर नोटीशीनंतर दलजीतने दिलं उत्तर; कोर्टाने दिले स्थगितीचे आदेश

Nikhil Patel And Daljeet Kaur News : केनियातील न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, निखिलने दलजित आणि तिचा मुलगा जेडनला त्यांच्या केनियातील घरातून बाहेर काढू नये, म्हणून हा आदेश देण्यात आला आहे.

Chetan Bodke

अभिनेत्री दलजीत कौर हिने निखिल पटेलसोबत मार्च २०२३ मध्ये लग्न केले. लग्नानंतर दलजीत कौर निखिलसोबत केन्याला शिफ्ट झाली होती. अचानकपणे केन्यामधून दलजीत कौर भारतात शिफ्ट झाली आहे. तेव्हापासून दलजीतच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगत आहे. लवकरात लवकर केनियामध्ये येऊन तुझं सामान परत घेऊन जा, अशी कायदेशीर नोटीस निखिलने दलजीतला पाठवली होती. आता अभिनेत्रीने या नोटिशीला उत्तर देत केन्यात जाऊन निखिलविरोधात कोर्टाकडून स्थगितीचा आदेश मिळवला आहे.

'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार, केनियातील न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, निखिलने दलजित आणि तिचा मुलगा जेडनला त्यांच्या केनियातील घरातून बाहेर काढू नये, म्हणून हा आदेश देण्यात आला आहे. त्यांचे सामानही बाहेर फेकून देण्यासही कोर्टाने नकार दिलेला आहे. केनियातील नैरोबी शहरातील मिलिमानी कोर्टाने ११ जून रोजी दिलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये म्हटले की, दलजितला किंवा तिच्या मुलाला अर्जाची अंतिम सुनावणी किंवा निर्णय येईपर्यंत घरातून बाहेर काढू नये.

नोटीसनुसार या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ जून रोजी होणार आहे. हा अर्ज दलजीत कौरनेच केनिया न्यायलयात दाखल केली होती. त्यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने निखिलला आदेश दिले आहेत. अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्या पतीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला होता. यानंतर निखिलनेही तिचे आरोप फेटाळून लावले होते. त्यांचे लग्न केनियात वैध नसल्याचे सांगितले होते.

निखिल पटेलनेही दलजीत कौरला कायदेशीर नोटीस पाठवली होती. जूनपर्यंत केन्याच्या घरी असलेले सर्व सामान घेऊन जायला सांगत होता. तसे न केल्यास सर्व सामान विकून त्याचे पैसे चॅरिटेबल ट्रस्टला दान करणार असल्याचं ही त्याने सांगितले. काही दिवसांपूर्वीच दलजित केनियाला गेली होती. यावेळी तिने कोर्टात धाव घेत निखिलने पाठवलेल्या नोटिसीवर स्थगिती आणली होती. ती आता भारतात आली असून दलजित कौर निखिलवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या, घटनाक्रम आला समोर

मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

SCROLL FOR NEXT