बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानसाठी (Salman Khan) २०२३ हे वर्ष काही खास राहिले नाही. या वर्षात सलमान खानचे चित्रपट चांगली कामगिरी करू शकले नाही. अशामध्ये या वर्षाच्या शेवटी सलमान खानला मोठा धक्का बसला आहे. सलमान खानबाबत एक मोठी बातमी समोर ये आहे. सलमान खानची ही बातमी त्याच्या चित्रपटांविषयी नाही आहे. तर सलमान खान एका पान मसाला कंपनीची जाहिरात केल्यामुळे अडचणीत आला आहे. याप्रकरणी सलमान खानसोबत हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. सलमानला नोटीस आल्याचे कळताच त्याचे चाहते नाराज झाले आहेत.
२०२३ या वर्षामध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हे बऱ्याच वादांमुळे चर्चेत राहिले आहे. यामधील एक प्रकरण म्हणजे पान मसाला जाहिरात. पान मसाला जाहिरात केल्याप्रकरणी या आधी अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुख खान यांना नोटीस पाठवण्यात आली होती. अक्षय कुमारने यासंदर्भात माफी देखील मागितली होती. आता पान मसाला जाहिरात केल्याप्रकरणी सलमान खान, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफला नोटीस पाठवण्यात आली आहे. यांच्यासोबत माजी क्रिकेटपटू कपिल देव, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांनाही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स पान मसाला कंपन्यांची जाहिरात करतात. यासंदर्भात लखनऊ हायकोर्टाचे वकील मोतीलाल यादव यांनी सलमान खान, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, कपिल देव, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग या सहा जणांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी या स्टार्सनी केलेला करार १५ दिवसांच्या आत संपुष्टात आणावा, असे या नोटीसमध्ये वकिलांनी लिहिले आहे. तसं झालं नाही तर या स्टार्सची नावेही पान मसाला जाहिरात प्रकरणाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात जोडले जाऊ शकते. कायदेशीर नोटीस आल्यामुळे या सहाही स्टार्सच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वी मोतीलाल यादव यांच्या याचिकेवर केंद्र सरकारने लखनऊ हायकोर्टाच्या निर्देशानुसार शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांना नोटीस बजावली होती. शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने पान मसाला कंपन्यांच्या जाहिराती प्रकरणी नोटीस बजावली होती. या अवमान याचिकेवर हे अपील फेटाळण्यासाठी केंद्र सरकारच्या वकिलाने लखनऊ खंडपीठाकडे अर्जही केला होता. अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्याविरोधात पाठवलेल्या नोटिसीची सुनावणी ९ मे २०२४ रोजी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.