Hey Pawlay Dev Majha Malhari Song Maharashtra Shaheer Released Saam TV
मनोरंजन बातम्या

Maharashtra Shaheer Song Released: १५ दिवसांनी 'महाराष्ट्र शाहीर'मधील 'हे पावलायं देव माझा मल्हारी' नवं गाणं प्रदर्शित

Ajay-Atul New Song: 'हे पावलायं देव माझा मल्हारी' गाणं आहे अतुल गोगावलेने गायले आहे.

Pooja Dange

Kedar Shinde Share New Song In Maharashtra Shaheer: शाहीर साबळे यांच्यावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट २८ एप्रिल २०३ रोजी प्रदर्शित झाला. महाराष्ट्रात या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील गाण्यांची विशेष चर्चा झाली. चित्रपटाप्रमाणे चित्रपटातील गाणी देखील खूप गाजत आहेत. अशातच आता चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. खुद्द केदार शिंदे यांनी पोस्ट करत ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोचवली आहे.

'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट प्रदर्शित होऊन १५ दिवस झाले आहे. असे असताना आता १५ दिवसांनी चित्रपटातील नवीन गाणे आज प्रदर्शित झाले आहे. 'हे पावलायं देव माझा मल्हारी' हे 'महाराष्ट्र शाहीर'मधील नवीन गाणं प्रदर्शित झाले आहे. केदार शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत गाण्याचे पोस्टर शेअर केलं आहे. (Latest Entertainmnet News)

केदार शिंदे यांनी त्यांच्या पोस्ट्मधेय लिहिले आहे, श्री खंडेरायाच्या आशीर्वादाने सादर करत आहोत अतुल गोगावलेंच्या दमदार आवाजातलं, लोकांच्या मनातलं गाणं 'हे पावलायं देव माझा मल्हारी'. एवरेस्ट मराठीच्या युट्यूब चॅनेलवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. एवढ्या २ तासात या गाण्याला ५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

'हे पावलायं देव माझा मल्हारी' या गाण्यात महाराष्ट्राची लोकधाराचा संपूर्ण प्रवास दाखवला आहे. शाहीर साबळे यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या महाराष्ट्राची लोकधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचली. या शोने अनेक कलाकार घडवले. शाहीरांच्या छत्रछायेखाली 'महाराष्ट्राची लोकधारा'मध्ये अनेक कलाकार घडले. त्यावर आधारित हे गाणे आहे अतुल गोगावलेने गायले आहे.

या गाण्यात अंकुश चौधरी, सना शिंदे, अश्विनी महांगडे, शुभांगी सदावर्ते, निर्मिती सावंत, मृन्मयी देशपांडे, दुष्यंत वाघ, देवा, अतुल काळे, अमित डोलावत आहेत. या गाण्याशी तुम्ही लगेच कनेक्ट व्हाल. 'हे पावलायं देव माझा मल्हारी' हे गाणे खूप सुंदर आहे. गाण्यातून महाराष्ट्राची लोकधाराची कथा देखील अप्रतिम पद्धतीने मांडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest Pain : छातीत दुखण्याचे कारण हार्ट अटॅक आहे कि गॅस, कसे ओळखाल? जाणून घ्या सविस्तर माहीती

Bichadna Song: दो दौर एक रास्ता...; 'सैयारा' फेम गायकाचं 'बिछडणं' हे डोळ्यात अश्रू आणणार नविन गाणं प्रदर्शित

Maharashtra Live News Update : यवत गावामध्ये सलग चौथ्या दिवशी जमावबंदी लागू

Mumbai To Surat Travel: मुंबई ते सूरत ट्रिप प्लॅन करताय? सर्वात जलद आणि स्वस्त प्रवासाचे पर्याय जाणून घ्या

Patoda News : देवदर्शनासाठी आले असता विपरीत घडले; धबधब्याच्या पाण्यात पोहत असताना एकाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT