Baipan Bhaari Deva Success Party Saam Tv
मनोरंजन बातम्या

Baipan Bhaari Deva Success Party : वंदना गुप्तेंचा डान्स अन् बाईपण भारी देवा टीमचा जल्लोष; चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशन

Baipan Bhaari Deva : बाईपण भारी देवाच्या चित्रपटाच्या टीमने चित्रपटाला मिळाले यश साजरे केले आहे.

Pooja Dange

Baipan Bhaari Deva Success Party Viral Video : केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस यश मिळवले आहेच त्यासह प्रेक्षकांच्या मनात देखील घर केले आहे. या चित्रपटाच्या कथेशी प्रेक्षक विशेषतः महिला स्वतः खूप कनेक्ट करतात. हेच चित्रपटाच्या यशाचे कारण आहे.

बाईपण भारी देवाच्या चित्रपटाच्या टीमने चित्रपटाला मिळाले यश साजरे केले आहे. बाईपण भारी देवा हा चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला अवघ्या २० दिवसात चित्रपटाने ६२ कोटींची कमाई केली आहे. तसेच अनेक रेकॉर्ड देखील बनवले आहेत. (Latest Entertainment News)

हा चित्रपट बनविण्यासाठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ३ वर्ष वाट पाहावी लागली. पण चित्रपटाची कास्टिंग एक समाधानाची बाब त्यांच्यासाठी होती. जिओ सिनेमा निर्मित या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

चित्रपटातील सर्व अभिनेत्री आणि त्यांचे सहकलाकार, चित्रपटाची इतर टीम या सक्सेस पार्टीला उपस्थित होते. केक कापून सेलिब्रेशनची सुरूवात झाली. तर दीपा आणि अंकुश चौधरीचा डान्स, तर वंदना गुप्ते आणि सुकन्या मोने यांचा भन्नाट सन्स व्हायरल होत आहे.

चित्रपटाची कथा

बाईपण भारी देवा हा चित्रपट स्त्रियांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटातील सहा बहिणी एकत्र येतात त्यानंतर त्यांच्या जीवनात कसा बदल होता. त्यांच्या आयुष्यात त्या कशाला तोंड देत असतात. हे दाखविण्यात आले आहे. मंगळागौर या मोठ्या स्पर्धेत त्या भाग घेतात आणि अनेक अडचणींना सामोरे जात त्या यशस्वी होतात. या दरम्यान त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते.

चित्रपटातील कलाकार

बाईपण भारी देवा चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, दिपा चौधरी, शिल्पा नवलकर यांनी सख्या बहिणींची मुख्य भुमिका साकरली आहे. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT