KBC 18 Saam Tv
मनोरंजन बातम्या

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

KBC 18: राजस्थानच्या कृष्ण कुमावत यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये ५० लाख रुपये जिंकले. १ कोटींच्या कठीण प्रश्नाचे उत्तर माहित नसल्याने त्यांनी खेळातून माघार घेतली.

Shruti Vilas Kadam

KBC 18: ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर अनेक स्पर्धक आपल्या ज्ञानासोबतच संघर्षाची कहाणी घेऊन येतात. याच मंचावर राजस्थानमधील कृष्ण कुमावत यांनी आपल्या मेहनतीची आणि जिद्दीची छाप सोडली. दिवसाला फक्त ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण यांनी KBCमध्ये तब्बल ५० लाख रुपये जिंकले. मात्र, १ कोटी रुपयांच्या प्रश्नावर पोहोचल्यानंतर त्यांनी जोखीम न घेता खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रवासाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

कृष्ण कुमावत

राजस्थानमधील शामपुरा येथील रहिवासी असलेले कृष्ण कुमावत गेल्या १० ते १५ वर्षांपासून टाइल फिटर म्हणून काम करत आहेत. घराच्या जमिनीवर, स्वयंपाकघरात आणि बाथरूममध्ये टाइल्स बसवण्याचे काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरातील मोठा मुलगा असल्याने आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कमी वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागली.

५० लाख रुपयांची रक्कम जिंकली

आर्थिक अडचणींमुळे कृष्ण यांनी १२ वी नंतर शिक्षण सोडले. मात्र, औपचारिक शिक्षण थांबले असले तरी शिकण्याची इच्छा त्यांनी कधीच सोडली नाही. ज्ञान मिळवण्याची त्यांची जिद्द आणि आवड त्यांना KBCच्या हॉट सीटपर्यंत घेऊन आली. शोमध्ये त्यांनी अत्यंत संयमाने आणि विचारपूर्वक प्रश्नांची उत्तरे देत ५० लाख रुपयांची रक्कम जिंकली.

पहिला विमान प्रवास

KBCमधील प्रवास कृष्ण यांच्यासाठी आणखी एका कारणामुळे खास ठरला. ही त्यांची मुंबईला येण्याची पहिलीच वेळ होती. एवढेच नव्हे, तर त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच विमान प्रवास केला. जिंकलेल्या पैशांचा उपयोग घराच्या नूतनीकरणासाठी आणि मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच पत्नीला मंगळसूत्र देण्याचेही त्यांचे स्वप्न आहे.

१ कोटी रुपयांचा प्रश्न

दरम्यान, १ कोटी रुपयांच्या प्रश्नासाठी अमिताभ बच्चन यांनी कृष्ण यांना पायथागोरसच्या प्रमेयाशी संबंधित प्रश्न विचारला. प्रश्न होता, “अमेरिकेचे कोणते भावी राष्ट्राध्यक्ष काँग्रेसचे सदस्य असताना पायथागोरसच्या प्रमेयाची मूळ सिद्धता प्रकाशित केली होती?” या प्रश्नासाठी झॅकरी टेलर, जेम्स बुकानन, रदरफोर्ड बी. हेस आणि जेम्स ए. गारफिल्ड हे पर्याय देण्यात आले होते. उत्तराबाबत खात्री नसल्याने कृष्ण यांनी ५० लाख रुपये घेऊन खेळातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचे योग्य उत्तर जेम्स ए. गारफिल्ड हे होते.

कृष्ण यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या कुटुंबासाठी मोठी मदत ठरणार आहे. अत्यंत साध्या परिस्थितीतून आलेल्या कृष्ण यांनी आपल्या ज्ञानाच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर KBCच्या मंचावर ५० लाखांची कमाई करत अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठेवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT