Amitabh Bachchan Host KBC 17 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan: 'मला नियम समजावू नका...'; १० वर्षाच्या मुलाने अमिताभ बच्चन यांचा केला अपमान, पाहा VIDEO

Amitabh Bachchan Host KBC 17: 'केबीसी १७' चा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामध्ये हॉट सीटवर बसलेला एक मुलगा अमिताभ बच्चनशी असभ्यपणे बोलताना दिसतो. या मुलाला आता सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

Shruti Vilas Kadam

Amitabh Bachchan Host KBC 17: "केबीसी १७" मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एक मुलगा हॉट सीटवर बसलेला आहे. जेव्हा अमिताभ बच्चन त्याला प्रश्न विचारतात तेव्हा तो अतिआत्मविश्वासाने आणि उद्धट स्वरात उत्तर देतो. याकडे अमिताभ बच्चनच्या चाहत्यांचे आणि सोशल मीडिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. व्हायरल व्हिडिओमधील मुलाच्या गैरवर्तनाने नेटकरी संतापले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी दाखवला संयम

"केबीसी १७" मधील हॉट सीटवर बसलेला मुलगा म्हणतो, "मला नियम माहिती आहेत तर तुम्ही आता मला नियम समजावून सांगू नका." अमिताभ बच्चन प्रश्न विचारण्यापूर्वीच तो उत्तर देत मला पर्याय नको सांगू असे उद्धटपणे बोलतो. पण, तो "रामायण" शी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी स्वत:चं पर्याय सांगा असं बोलतो. संपूर्ण एपिसोडमध्ये, मुलाच्या गैरवर्तनानंतरही अमिताभ बच्चन शांत राहतात. हा मुलगा गुजरातच्या गांधीनगरचा आहे. त्याचे नाव इशित भट्ट आहे. १० वर्षांचा इशित भट्ट हा पाचवीचा विद्यार्थी आहे.

नेटकऱ्यांनी पालकांवर प्रश्न उपस्थित केले

'केबीसी १७' चा हा व्हिडिओ किंवा एपिसोड सोशल मीडिया नेटकऱ्यांनी पाहिला तेव्हा त्यांनी मुलाच्या पालकांवर टीका केली. एका नेटकऱ्याने कमेंट केली, "जया बच्चन व्हर्जन." दुसऱ्याने लिहिले, " जया बच्चन यांनी या एपिसोडसाठी अमिताभनची जागा घ्यावी." दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केली, " या मुलाला वडीलधाऱ्यांचा आदर करायला शिकवले पाहिजे."

अमिताभ बच्चन यांनीही टीका केली

जेव्हा मुलाने रामायणाशी संबंधित चुकीचं उत्तर दिल्यावर अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "तूच एकमेव असा आहेस जो हुशार नाहीस." त्यानंतर ते हसले. चुकीचे उत्तर दिल्याने मुलाचा चेहरा पूर्णपणे पडला. मुलाचे पालकही खूप निराश दिसत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल 10 मिनिटे विलंबाने सुरु

Calcium Deficiency: कॅल्शियमची कमतरता असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणं

Chinch Gulachi Amti Recipe: आंबट- गोड चिंच, गुळाची आमटी कशी बनवण्याची? सोपी रेसिपी जाणून घ्या

Shanaya Kapoor: शिमर ड्रेसमध्ये शनाया कपूरचा सिझलिंग लूक व्हायरल, पाहा PHOTO

Army Jeep Accident: लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; वळणावरून जाताना जीप उलटली, मेजरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT