Merry Christmas New Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Merry Christmas: कतरिना कैफ-विजय सेतुपथी यांचं मेरी ख्रिसमस, 'नजर तेरी तुफान' गाण्यात दिसली केमिस्ट्री

Merry Christmas Movie: कतरिना कैफ लवकरच दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपथीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. कतरिना आणि विजय सेतुपथी मेरी ख्रिसमस या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मेरी ख्रिसमस या चित्रपटाचे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Merry Christmas Najar Meri Tufan Song Release:

बॉलिवूडची अभिनेत्री कतरिना कैफ ही नेहमीच चर्चेत असते. कतरिना कैफ लवकरच दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपथीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. कतरिना आणि विजय सेतुपथी मेरी ख्रिसमस या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मेरी ख्रिसमस या चित्रपटाचे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. (Latest News)

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर "मेरी ख्रिसमस" ची चर्चा सोशल मीडियावर आहे. चित्रपटातील नवीन गाणे "नजर तेरी तुफान" हे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याने चाहत्यांना भूरळ घातली आहे.

अप्रतिम संगीत आणि सुंदर गाणे असलेल्या या गाण्याची चर्चा सर्वत्र आहे. प्रख्यात संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यात पारंपारिक आणि समकालीन संगीताचा मिलाफ करण्यात आला आहे. प्रीतमचा सिग्नेचर टच या गाण्यातून दिसून येतोय. पापोनने हे गाणे सुंदर गायले आहे. तर प्रख्यात गीतकार वरुण ग्रोव्हर यांनी हे गाणं लिहिलं आहे.

श्रीराम राघवनच्या "मेरी ख्रिसमस" मधील कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काझमी, टिन्नू आनंद, अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात बघायला मिळणार आहे. चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये कतरिना आणि विजय राधिका सरथकुमार, गायत्री, षणमुगराजन, काविन जय बाबू आणि राजेश विल्यम्ससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

ZP School : जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी गंभीर, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT