Katrina Kaif Net Worth SAAM TV
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif Net Worth : 'बॉलिवूडची कॅट' किती कोटींची मालकीण? आकडा ऐकून थक्क व्हाल, विकी कौशलपेक्षा आहे श्रीमंत

Shreya Maskar

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif ) नेहमीच चर्चेत असते. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. कतरिनाने अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली. हे बॉलिवूडचं क्यूट कपल आहे. विकी-कतरिनाची केमिस्ट्री चाहत्यांना खपू आवडते. कतरिना चित्रपटाव्यतिरिक्त इतर अनेक माध्यमातून पैसे कमावते.

कतरिना एका चित्रपटात काम करण्यासाठी 15 ते 21 कोटी रुपये घेते. कतरिना विकी कौशलपेक्षा जास्त कमावते. तसेच कतरिना ब्युटी ब्रँडची अ‍ॅम्बेसेडर देखील आहे. यातून ती 7 कोटी रुपये कमवते. कतरिनाचा एक स्वत:चा ब्युटी ब्रँडही आहे. या ब्युटी ब्रँडची सुरुवात कतरिनाने 2019 मध्ये केली. तिच्या ब्युटी ब्रँडचे नाव 'kay' असे आहे. कतरिनाला या ब्युटी ब्रँडमधून 12 कोटी रुपये मिळतात. कतरिना बिजनेसवुमन, अभिनेत्री असूनही ती स्टेज शो देखील करते. ज्यातून तिची मोठी कमाई होते.

अभिनेत्री कतरिना कैफकडे मुंबईत 3BHK अपार्टमेंट आहेत. या अपार्टमेंटची किंमत सुमारे 8.20 कोटी रुपये आहे. कतरिनाचे वांद्रे येथे एक 4BHK पेंटहाऊस आहे. या पेंटहाउसमध्ये कतरिना तिच्या पतीसोबत राहते. अभिनेत्री कतरिनाची लोंखडवाला येथे 17 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. कतरिनाचा लंडनमध्ये देखील बंगला आहे. लंडनमधील या बंगल्याची किंमत सुमारे 6 कोटी रुपये आहे. कतरिनाकडे 42 लाखांची ऑडी, 50 लाख रुपयांची मर्सिडीज, 80 लाखांची ऑडी क्यू आणि अडीच कोटी रुपयांची रेंज रोव्हर व्होग आहे. अभिनेता विकी कौशलकडे (Vicky Kaushal) एकूण 41 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर 'बॉलिवूडची कॅट' तब्बल 224 कोटींची मालकीण आहे. विकी आणि कतरिना कैफची एकूण संपत्ती (Net Worth) 265 कोटी रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अक्षय शिंदेचा मृत्यू अती रक्तस्त्रावाने, पोर्स्टमॉर्टम अहवाल आला समोर

Assembly Election: जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून आता भाजपमध्येच रस्सीखेच सुरू; माजी नगरसेविकेनंतर आता जिल्हाध्यक्षांना हवी उमेदवारी

konkan : कोकणातल्या गर्द झाडीत लपलाय ऐतिहासिक किल्ला

PM Modi Pune Visit : PM नरेंद्र मोदी २६ रोजी पुणे दौऱ्यावर, कसा असेल दौरा? वाचा सविस्तर

Ajit Pawar: 'आमचं दैवत पवारसाहेबच', अजित पवार यांचा पश्चाताप की रणनीतीचा भाग? वाचा Special Report

SCROLL FOR NEXT