Katrina Kaif Pregnancy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif Pregnancy: कतरिना-विकीच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Katrina Kaif Pregnancy: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी 4 वर्षांपूर्वी लग्न केले आणि आता ते त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी तयार आहेत.

Shruti Vilas Kadam

Katrina Kaif Pregnancy News: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केले आणि आता ते त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी तयार आहेत. कतरिना कैफने अखेर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. कतरिना आणि विकी यांनी सोशल मीडियावर एक क्यूट फोटो पोस्ट करत त्यांच्या बाळाच्या आगमनाची घोषणा केली आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या खास पोलरॉइड फोटोमध्ये कतरिनाचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत असून विकी कौशल तिला हळुवार स्पर्श करताना दिसतो. या दोघांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंदाची झलक पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

फोटोसोबत त्यांनी लिहिलं आहे, "आनंद आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणासह आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय सुरू करण्याच्या मार्गावर. ॐ”. या शब्दांमधून त्यांच्या हृदयात दाटलेली कृतज्ञता आणि अपार आनंद सहजपणे जाणवतो. दोघेही आपल्या नव्या जबाबदारी आणि पालकत्वाचा अनुभव घ्यायला सज्ज झाले आहेत.

कतरिना आणि विकी कौशल यांचा विवाह 2021 मध्ये राजस्थानमध्ये पारंपरिक पद्धतीने झाला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याची प्रत्येक झलक चाहत्यांसाठी खास ठरली आहे. दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल, एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच कुतूहल राहिले आहे. आता त्यांच्या या मोठ्या घोषणेमुळे चाहत्यांचा उत्साह आणि आनंद अधिकच वाढला आहे. चाहते आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT