Kartik Aaryan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan : करण जोहर कडून १० किंवा २० नाही तर तब्बल ५० कोटी घेणार कार्तिक आर्यन 'या' नवीन चित्रपटासाठी

Kartik Aaryan : 2024 मध्येही कार्तिक आर्यनने अनेक दिग्गज कलाकारांचा मागे टाकले आहे. लवकरच त्याच्या करण जोहर निर्मित नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणारअसल्याची घोषणा करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kartik Aaryan : बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यनची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. आजच्या घडीला कार्तिक निर्मात्यांची पहिली पसंती बनला आहे. येत्या वर्षी अनेक चित्रपट कार्तिक करणारा असून सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-10 चित्रपटांच्या यादीत 4 बॉलिवूड चित्रपटांनी आपले स्थान निर्माण केले आहे. यामध्ये कार्तिकचा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टॉप 10 च्या या यादीत कार्तिक आर्यन दुसऱ्या स्थानावर आहे. 2024 मध्ये कार्तिकच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाने 396 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. जो या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर कल्ला केल्यानंतर आता कार्तिक आर्यनने पुढील वर्षासाठीही पूर्ण तयारी केली आहे.

कार्तिक आर्यनने आगामी वर्षाची पूर्ण तयारी केली आहे. कार्तिकचा 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' हा चित्रपट येत्या वर्षी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी समीर विद्वांस यांनी घेतली आहे. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. पण, विशेष म्हणजे या चित्रपटासाठी कार्तिक आर्यन तब्बल ५० कोटी चार्ज करणार आहे.

पोस्ट शेअर करून चाहत्यांना केले आश्चर्यचकित

कार्तिकने पोस्ट शेअर करून आपल्या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे. पोस्ट शेअर करताना कार्तिकने लिहिले की, 'आईने दिलेले वचन हा आईचा मुलगा पूर्ण करेल. तुझा रे लवकरच येईल रुमी. 2026 मधील सर्वात मोठ्या प्रेमकथेबद्दल उत्सुक आहे. या चित्रपटात कार्तिक शिवाय इतर कलाकार कोण आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

कार्तिक आर्यनने आपल्या 13 वर्षांच्या करिअरमध्ये 22 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'प्यार का पंचनामा', 'आकाश वाणी', 'कांची', 'प्यार का पंचनामा-2', 'गेस्ट इन लंडन', 'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'लुका छुपी' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. . 2024 मध्ये 'भूल भुलैया 3' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.हा चित्रपट भारतीय चित्रपटांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. 'स्त्री 2' नंतर कार्तिकचा चित्रपट बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT