Kartik Aryan And Allu Arjun Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan: कार्तिक आर्यनची थेट तुलना अल्लू अर्जुनशी; 'त्या'मागील उत्तर केले स्पष्ट

सध्या सोशल मीडियावर कार्तिकची तुलना अल्लू अर्जुनशी केली जात आहे. यावर आता कार्तिकने आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

Chetan Bodke

Kartik Aaryan On Allu Arjun: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या 'शेहजादा' चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. चित्रपटात कार्तिकसोबत क्रितीही दिसणार आहे. हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठापुरमुलू' या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. सध्या सोशल मीडियावर कार्तिकची तुलना अल्लू अर्जुनशी केली जात आहे. यावर आता कार्तिकने आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. कार्तिक म्हणतो, माझी तुलना कोणत्याही अभिनेत्याशी व्हायला हरकत नाही कारण, त्याला त्याच्या भूमिकेवर पुर्णपणे विश्वास आहे.

एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, कार्तिक आर्यनला विचारण्यात आले की, तुझी अल्लू अर्जुनशी तुलना केल्याने घाबरला आहे का? यावर त्याने प्रतिक्रिया दिली की, 'प्रत्येक चित्रपटात माझी तुलना कोणत्या ना कोणत्या चित्रपटाशी केली जाते. मी त्यावर प्रतिक्रिया देत नाही किंवा विचार करत नाही, याचा अर्थ मी घाबरलो नाही. मला ही या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, तेव्हा मी अशा गोष्टींचा विचारही केला नव्हता. कारण मला माहित आहे की, माझ्या सोबत अशा घटना प्रत्येक चित्रपटात घडतात.'

तर कार्तिक आर्यन पुढे म्हणाला, 'मी आधी 'भूल भुलैया' आणि आता 'शेहजादा'मध्ये हाच पॅटर्न पाहिला आहे. हा एक सामान्य प्रश्न आहे, जो मला वारंवार विचारला जातो, परंतु मला त्यात कोणतीही अडचण नाही. मी माझे काम नेहमी असे करतो की, माझ्या चाहत्यांना मी साकारलेली व्यक्तिरेखा नक्कीच प्रेक्षकांना आवडेल याचा मी पुर्ण पणे प्रयत्न करतो.'

कार्तिक आर्यनचा 'शेहजादा' चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. रोहित धवन दिग्दर्शित हा अॅक्शन-ड्रामा चित्रपट असून चित्रपटात कार्तिक आर्यनचा अॅक्शन अवतार पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. 'शहजादा'मध्ये कार्तिकसोबत क्रिती सेनॉन, राजपाल यादव, रोनित रॉय, परेश रावल यांसारखे दिग्गज स्टार्स दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात; ४८०कोटी रुपये वाटपास मंजुरी, कोणत्या जिल्ह्यांना मिळेल मदत

Thurday Horoscope : हितशत्रूंचा त्रास संभवतोय, अडचणी मागे लागतील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात साडेसातीचे संकेत

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून ४० किमी अंतरावर आहे सुंदर मंदिर; ८०० वर्ष जुन्या या मंदिराला नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शरद पवारांच्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का; विश्वासू नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT