Kartik Aaryan  saam tv
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan : इच्छाधारी नागाच्या रुपात कार्तिक आर्यन; नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू, रिलीज डेट काय?

Kartik Aaryan New Movie : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. रिलीज डेट आताच जाणून घ्या.

Shreya Maskar

कार्तिक आर्यन इच्छाधारी नागाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कार्तिक आर्यनच्या नवीन चित्रपटाचे नाव 'नागझिला' आहे.

कार्तिक आर्यनच्या 'नागझिला' चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) कायम त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैय्या' चित्रपट खूप गाजला. आज (1 नोव्हेंबर 2024) 'भूल भुलैय्या 3' रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. यासंबंधित एक खास पोस्ट कार्तिक आर्यनने शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कार्तिक आर्यनने 'भूल भुलैय्या 3' च्या रिलीज डेटलाच आपल्या नवीन चित्रपटाच्या शूटिंग सुरू केली आहे.

कार्तिक आर्यन 'नागझिला' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. 'नागझिला' चित्रपटाच्या नावाचा क्लॅपबोर्ड धरून हसतानाचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला कार्तिक आर्यनने खूप हटके कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिलं की, "'भूल भुलैय्या 3' ला 1 वर्ष पूर्ण झाले... 'नागझिला' चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला दिवस...हर हर महादेव!" तसेच त्याने पोस्टमध्ये नवीन चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे.

कार्तिक आर्यनच्या या पोस्टवर चाहते, कलाकार मंडळी यांच्याकडून कमेंट्स, कौतुकाचा वर्षाव होत आहे. चाहते कार्तिक आर्यनचा नवीन चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे. कारण कार्तिक या चित्रपटात एका वेगळ्या रुपात, अंदाजात पाहायला मिळणार आहे. 'नागझिला' चित्रपटाचे दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा आहेत. एप्रिल महिन्यात 'नागझिला'चे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यात कार्तिक आर्यन नागाच्या रुपात पाहायला मिळाला.

चित्रपटाची रिलीज डेट

कार्तिक आर्यनचा नवीन चित्रपट 'नागझिला' 14 ऑगस्ट 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नागझिला' हा कॉमेडी चित्रपट असल्याचे बोले जात आहे.चित्रपटात कार्तिक आर्यन नागाच्या भूमिकेत दिसत असून नागीणीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री पाहायला मिळणार याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेनेच्या आमदाराकडून भाजप नेत्याला धमकी; राजकारण तापलं, नेमकं घडलं काय?

सेल्फीचा मोह जीवावर बेतला, तरुण थेट नदीत पडला|VIDEO

Maharashtra Live News Update : मालेगाव घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरच्या अकोलेत मोर्चा

Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचा कार अपघातात मृत्यू ; वयाच्या ४० व्या वर्षी निधन,संगीत विश्वात शोककळा पसरली

Amravati : धक्कादायक! सिनियरचा त्रास असाह्य झाला, फायर ब्रिगेड कर्मचाऱ्याची आत्महत्या

SCROLL FOR NEXT