'Satyaprem Ki Katha' OTT release Saam TV
मनोरंजन बातम्या

Satyaprem Ki Katha On OTT: कार्तिक-कियाराचा 'सत्यप्रेम की कथा' OTTवर प्रदर्शित; जाणून घ्या कधी, कुठे पाहू शकता चित्रपट

Satyaprem Ki Katha OTT Release: निर्मात्यांनी सत्यप्रेमची कथा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pooja Dange

Satyaprem Ki Katha Released On Amazon Prime:


कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा सत्यप्रेम की कथा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. कियारा आणि कार्तिकची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. लवकरच हा ओटीटीवर पाहता येणार आहे.

सत्यप्रेम की कथा ही चित्रपट 29 जून रोजी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आणि काही दिवसांतच एकूण बजेटपेक्षा जास्त कमाई केली. आता निर्मात्यांनी सत्यप्रेमची कथा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन जे चित्रपटगृहात चित्रपट पाहू शकले नाहीत त्यांना आता घरी बसून कुटुंबासह त्याचा आनंद घेता येईल.

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा रोमँटिक ड्रामा चित्रपट सत्यप्रेम की कथा Amazon Prime Video वर प्रसारित होणार आहे. आजपासून म्हणजेच 24 ऑगस्ट 2023 पासून, प्रेक्षक OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहू शकतात.

सत्यप्रेम की कथा या चित्रपटाच्या व्यवसायावर नजर टाकल्यास, चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 9.25 कोटींची कमाई केली होती. तसेच ओपनिंग वीकेंडला चित्रपटाने 27.35 कोटींचा गल्ला जमवला होता.

सत्यप्रेम की कथा या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दमदार कलेक्शन केले. चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात 51.60 कोटींचा व्यवसाय केला. तर दुसऱ्या आठवड्यात 68.60 कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात 74.85 कोटींचे कलेक्शन केले. सत्यप्रेम की कथाच्या लाईफटाइम कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 77.55 कोटींचा व्यवसाय केला.

सत्यप्रेमची कथा समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्यासह सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रांदेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तलसानिया यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे.

कार्तिक आर्यानच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर सध्या तो त्याचा आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'ची तयारी करत आहे. एक एक गेम मा चित्रपट आहे. तर कियारा अडवाणींच्या वर्कफ्रंटबद्दल, कियारा, राम चरणसोबत गेम चेंजरमध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT