Karishma Kapoor Children Saam Tv
मनोरंजन बातम्या

Karisma Kapoor Children: करिश्माच्या मुलांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; सावत्र आईला विकता येणार नाही वडील संजय कपूरची प्रॉपर्टी

Karisma Kapoor Children: करिश्मा कपूरच्या मुलांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली हायकोर्टाने संजय कपूर यांच्या संपत्तीवर स्थगिती देत वारसाहक्क प्रकरणात महत्त्वाचा निर्णय घेतला.

Shruti Vilas Kadam

Karisma Kapoor Children: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या मुलांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीवरील वाद प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली हायकोर्टाने संजय कपूर यांच्या भारतातील सर्व मालमत्तेवर ‘स्टेटस क्वो’ ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे कोणतीही नवीन व्यवहार प्रक्रिया किंवा तिसऱ्या पार्टीचा हस्तक्षेप होऊ शकणार नाही. हा निर्णय करिश्मा कपूर यांच्या मुलांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीवरून वाद निर्माण झाला होता. करिश्मा कपूर यांची मुलं समायरा आणि कियान यांनी त्यांच्या वडिलांच्या संपत्तीतील हक्कासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी स्वतःला ‘क्लास-1’ वारस असल्याचा दावा करत संपत्तीतील आपला वाटा मागितला आहे.

या प्रकरणात संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नी प्रिया कपूर यांच्याशी मुख्य वाद आहे. मुलांच्या बाजूने असा आरोप करण्यात आला आहे की, त्यांच्या वडिलांच्या वारसाहक्कामध्ये मुलांचे नाव असून त्यांना मुद्दाम वगळण्यात आले.

दरम्यान, न्यायालयाने वारसाहक्काच्या खरे आहे की नाही यावर देखील प्रश्न उपस्थित करत सर्व बाजूंची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याआधीही न्यायालयाने वारसाहक्काचे फॉरेन्सिक तपासणी करण्यास परवानगी दिली होती. संजय कपूर यांची संपूर्ण संंपत्ती ३०,००० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा वाद देशातील सर्वात चर्चेत असलेल्या कौटुंबिक संपत्ती वादांपैकी एक ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Handi Horoscope : आज या राशींना मिळू शकतो आर्थिक लाभ! दहीहंडी आणि शिक्षक दिनाचा योग; पंचांगात काय आहे खास? वाचा

Bad Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यावर रात्री पायांमध्ये दिसतात 'ही' ५ लक्षणे, दुर्लक्ष करणे पडेल महागात

IND vs PAK women: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आजच्या सामन्यात कोण मारणार बाजी; कुठे पाहता येणार सामना?

Maharashtra News Live Update: पुणे- डीजे,स्पीकर विरोधात परत एकदा पुणेकर रस्त्यावर उतरणार

Pune Police: बनावट प्रमाणपत्रे दाखवत १९ उमेदवार झाले पोलिस, दोघांना बेड्या; पुणे पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT