Karishma Kapoor-Ranbir Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor: आलिया नव्हे तर रणबीरची पत्नी म्हणून करिश्मा कपूरला पसंत होती 'ही' अभिनेत्री

Karishma Kapoor-Ranbir Kapoor: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतो. तो अभिनयासोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आता रणबीर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतो. तो अभिनयासोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आलियासोबत लग्न होण्याआधी रणबीरचे नाव अनेक अभिनेत्रींसोबतच जोडले गेले होते. यामध्ये सोनम कपूरचे नावदेखील रणबीरशी जोडले होते. रणबीरची बहिण करिश्मा कपूरला सोनम कपूर तिची वहिनी व्हावी, असे वाटतं होतं.

रणबीर कपूर आणि करिश्मा कपूर भावंड आहेत. एकेकाळी करिश्माला सोनम कपूर रणबीरची बायको व्हावी असे वाटत होते. याचा खुलासा स्वतः सोनम कपूरने केला होता. सोनम कपूरने कॉफी विथ करण शोमध्ये याबाबत वक्तव्य केले होते.

सोनम कपूर आणि करिना कपूर करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये एकत्र आल्या होत्या. त्यावेळी सोनमने याबाबत खुलासा केला. करण जोहरनं तिला प्रश्न विचारला की, तू कपूर कुटुंबाची सून व्हायचा विचार केला आहे का? त्यावर सोनमने उत्तर दिले होते की, 'मला वाटतं की, करिश्मा कपूरची इच्छा होती, परंतु आम्ही फक्त चांगले मित्र आहोत'.

रणबीर आणि सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सोनम कपूर आणि रणबीर कपूरने 'सांवरिया' या चित्रपटातून पदार्पण केले होते. याचदरम्यान त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. परंतु त्यानंतर काही दिवसातच रणबीरचं दीपिका पदुकोणसोबत नाव जोडलं गेलं होतं. त्यानंतर या दोघांचे नातं संपल्याच्या चर्चा होऊ लागल्या. अशातच कॉफी विथ करण मध्ये सोनम कपूरने याबाबत मोठा खुलासा केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : राज्यावर आर्थिक संकट, ८० लाख महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळली, नेमकं सत्य काय?

Handvo Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी गुजराती हांडवो, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: कांद्याला हमीभावासाठी मंचरमध्ये आज शेतकरी पुणे नाशिक महामार्ग रोखणार

गुजरात टायटन्स थोडक्यात बचावले, गिलसह संपूर्ण टीम बसमध्ये असताना आग

Fact Check: वैभव सूर्यवंशीला काव्याकडून घड्याळ गिफ्ट? पुढच्या वर्षी वैभव हैद्राबाद संघातून खेळणार?

SCROLL FOR NEXT