Kareena Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor: "आई.., मी खरंच इतका फेमस आहे?" तैमूरच्या प्रश्नावर करिनाचं उत्तर ऐकलं का? Video पाहा

Kareena Kapoor Interview: चित्रपट महोत्सवाच्या कार्यक्रमात करिनाने, तैमूर माझ्यासोबत असताना त्याला काय वाटते याबाबत खुलासा केला आहे.

Manasvi Choudhary

अभिनेत्री करिना कपूर ही सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे . करिनाने तिच्या सिनेसृष्टीतल्या कारकीर्दीत आव्हानात्मक चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. करिनाच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. याचनिमित्ताने करिनाचा 'चित्रपट महोत्सव' या कार्यक्रमाचे खास आयोजन करण्यात आले आहे.

अभिनेत्री करिना कपूर चित्रपट महोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी करिनाच्या स्टायलिश लूकने सर्वांचेच लक्ष वेधले. करिनाने डिझायनर गाऊन परिधान केला आहे. याचदरम्यानचा करिनाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये करिना मुलगा तैमूरविषयी सांगत आहे.

चित्रपट महोत्सवाच्या कार्यक्रमात करिनाने, तैमूर माझ्यासोबत असताना त्याला काय वाटते याबाबत खुलासा केला आहे. करिनाने सांगितले की तैमूर आणि मी जेव्हा एकत्र असतो तेव्हा पापाराझी आमचा पाठलाग करतात. तेव्हा तैमूर विचारतो, "हे सर्वजण आपला पाठलाग का करतात? मी एवढा फेमस आहे का? यावर करिना तैमूरला म्हणते, तू नाही.. मी लोकप्रिय आहे. अजूनतरी तू फेमस होण्यासारख काही काम केलं नाही. यावर तैमूर म्हणतो, ठीक आहे मी आज प्रसिद्ध नाही. पण मी एक दिवस असं काही काम करेन. की मी सुद्धा लोकप्रिय होईन." याशिवाय करिनाने तैमूरला सध्या फुटबॉल खेळायला आवडत असल्याचं सांगितलं आहे.

करिनाने चित्रपटसृष्टीत काम करून २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे खास ‘करीना कपूर खान महोत्सव’ चे आयोजन केले आहे. २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान १५ शहरे आणि ३० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. मुंबई,दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, गुरगाव, नोएडा, पुणे, चंदीगड, लखनौ, जयपूर, इंदूर, हैदराबाद, भुवनेश्वर आणि त्रिवेंद्रम या शहरात हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fat Girls Fashion: बॉडीकॉन सारख्या ड्रेसमध्ये जाड दिसता? मग, तुमच्यासाठी हे ड्रेस टाईप आहेत परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह

Maharashtra Politics : पुण्यानंतर आता ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय हालचाली वाढल्या

Maharashtra Live News Update : नाताळ आणि थर्टीफस्ट निमित्त मालवणमध्ये पर्यटक दाखल

कंठ दाटला, डोळ्यात पाणी; नाशिकच्या राड्यानंतर फरांदे स्पष्टच बोलल्या, थेट भाजपची चूक सांगितली

Pushkar Jog: 'माझं घर गेलं...'; मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुंबईतील फ्लॅटला लागली भीषण आग, थोडक्यात वाचला जीव

SCROLL FOR NEXT