The Traitors Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Traitors Trailer: करण जोहरच्या शोमध्ये 'या' २० सेलिब्रिटींची एन्ट्री; या दिवशी होणार 'द ट्रेटर्स'ची सुरुवात

The Traitors Trailer: प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी रिअॅलिटी शो 'द ट्रेटर्स'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला आहे. हा शो लवकरच प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे.

Shruti Vilas Kadam

The Traitors Trailer: प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी रिअॅलिटी शो 'द ट्रेटर्स'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला आहे. हा शो १२ जून २०२५ पासून प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार असून, प्रत्येक गुरुवारी रात्री ८ वाजता नवीन भाग दाखवला जाईल. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर करणार आहे. 'द ट्रेटर्स' हा आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या BAFTA आणि Emmy पुरस्कार विजेती रिअॅलिटी शो आहे.

'द ट्रेटर्स' या शोमध्ये २० सेलिब्रिटी स्पर्धक राजस्थानमधील भव्य सूर्यगड पॅलेसमध्ये एकत्र येतील. त्यांना विविध शारीरिक आणि मानसिक चाचण्यांमधून जाऊन एक मोठी रोख रक्कम जिंकायची आहे. या स्पर्धकांमध्ये काही 'ट्रेटर्स' (विश्वासघात करणारे) असतील, ज्यांची निवड करण जोहर शोच्या सुरुवातीला गुप्तपणे करतील. उर्वरित 'फेथफुल्स' (विश्वासू) स्पर्धकांना या ट्रेटर्सना ओळखून त्यांना बाहेर काढायचे आहे. जर ट्रेटर्स शेवटपर्यंत उघड न झाले, तर ते संपूर्ण बक्षीस जिंकतील.

शोमध्ये अंशुला कपूर, अपूर्वा, आशिष विद्यार्थी, उर्फी जावेद, करन कुंद्रा, जन्नत जुबैर, रफ्तार, राज कुंद्रा, माहीप कपूर, निकिता लूथर, एलनाज नोरोजी, लक्षणी मंचू, आणि इतर अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. या शोमध्ये स्पर्धकांमध्ये विश्वास, धोका, आणि रणनीती यांचा खेळ पाहायला मिळणार आहे.

करण जोहरने सांगितले की, "हा शो खोटेपणा, फसवणूक, विश्वासघात आणि भरपूर ड्रामाने भरलेला आहे. मी या शोमध्ये केवळ सूत्रसंचालकच नाही, तर या सगळ्या गोंधळाचा साक्षीदारही आहे. स्पर्धकांची रणनीती, त्यांच्यातील संघर्ष, आणि गुप्त योजना या सगळ्याचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बांगलादेशकडून कांदा आयातीवर निर्बंध, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

Success Story: कौतुकास्पद! IPS ट्रेनिंगदरम्यान झाले IAS; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; ऋत्विक वर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT