Manasvi Choudhary
केसांमधील कोंडा या समस्येने महिला व पुरूष दोन्हींही कंटाळलेले आहेत. केसांच्या कोंडा कमी करण्यासाठी सोपे उपाय कोणते ते पाहूया.
महागड्या उत्पादनांपेक्षा तुम्ही घरच्या घरी कोणते उपाय प्रभावी ठरतील हे पाहूया.
लिंबामध्ये असलेल्या सायट्रिक ॲसिडमुळे केसांतील कोंडा दूर होण्यास मदत होते. तेल टाळूना ओलावा देते.
कोरफड टाळूला थंडावा देते आणि खाज कमी करते. यामुळे केसांचा कोरडेपणाही दूर होतो.
दही टाळूसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते आणि काळ्या मिरीमध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात. एक कप दह्यात थोडी काळी मिरी पावडर मिसळा. हे मिश्रण टाळूला लावा आणि १ तासानंतर केस धुवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.