Karan Johar Responds If He's Gay On Threads Instagram
मनोरंजन बातम्या

Karan Johar Question: ‘तू गे आहेस का?’ चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर करण जोहरचे विचित्र उत्तर, थेट म्हणाला; तुला...

Fans Asked Questions To Karan Johar In Ask Me Anything: करणने सोशल मीडियावर ‘आस्क मी एनिथिंग’च्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला.

Chetan Bodke

Karan Johar Responds If He's Gay On Threads: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरला यावर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू करून २५ वर्ष उलटतील. सोबतच कारण जोहर ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटामुळे तो तुफान चर्चेत आहे. नुकतच त्याने काही वेळासाठी सोशल मीडियावर ‘आस्क मी एनिथिंग’च्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. या सेशनमध्ये करणने चाहत्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तर दिले आहेत. यावेळी त्याला चाहत्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील प्रश्न आणि त्याच्या व्यावसायिक जीवनातील देखील काही प्रश्न विचारले.

सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या थ्रेड्स ॲपवर करणने ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये करणला त्याच्या खासगी आयुष्यातील काही प्रश्न विचारण्यात आले. करणला एका युजरने सोशल मीडियावर एक प्रश्न विचारला, ‘तू गे आहेस का?’ यावर करण म्हणतो, ‘तुला माझ्यात इंटरेस्ट आहे का ?’ त्याच्या या उत्तराने सोशल मीडियावर करणची तुफान चर्चा सुरू झाली आहे.

याच सेशनमध्ये करणला आणखी एक युजरने प्रश्न विचारला आहे. ‘तुला आयुष्यात कोणत्या गोष्टीची सर्वात मोठी खंत वाटते?’ या प्रश्नावर करण म्हणतो, “मला माझ्या आवडत्या अभिनेत्री श्रीदेवी मॅम यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही.”

तर आणखी एका युजरने करणला खूप छान प्रश्न विचारला. या प्रश्नाची ही सर्वत्र तुफान चर्चा सुरू आहे. करणला एक युजरने प्रश्न विचारला की, ‘एका २० वर्षीय तरुण मुलाला तुमच्या सारखा यशस्वी दिग्दर्शक व्हायचे आहे, त्याला काय सल्ला द्याल.’ असा त्याने प्रश्न विचारला.

त्यावर करण जोहर म्हणतो, ‘तू तुझ्या आयुष्यातील निष्कर्ष काढणाऱ्या लोकांचं न ऐकता स्वतःवर विश्वास ठेव. चित्रपटाबद्दल आवश्यक तो सर्व अभ्यास कर. एक दिग्दर्शक होणे अनेकदा आव्हानात्मक ठरते कारण, लोकांशी आणि कधीकधी त्यांच्या अहंकाराबरोबर जुळवून घ्यावे लागते.” असा सल्ला यावेळी करणने त्याच्या चाहत्याला दिला आहे.

करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ हा चित्रपट येत्या २८ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा गेल्या काही दिवसांपूर्वी धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. या धमाकेदार ट्रेलरने सर्वच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणून धरली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आलिया आणि रणवीर सिंग व्यतिरिक्त धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, रोनित रॉय, अर्जुन बिजलानी, क्षिती जोग, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया दिसणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT