Karan Johar reacted to Priyanka Chopra Anushka Sharma's allegation
Karan Johar reacted to Priyanka Chopra Anushka Sharma's allegation  Instagram
मनोरंजन बातम्या

Karan Johar Post: प्रियांका-अनुष्काने केलेल्या आरोपांवर करणचे चोख प्रत्युत्तर; थेट कविताच केली पोस्ट

Pooja Dange

Karan Johar Reacted Through Poem: कारण जोहर आणि बॉलिवूड हे एक वेगळे समीकरण आहे. कारण जोहरवर अनेक आरोप करण्यात येतात. नेपोकिड्सला सपोर्ट करणाऱ्या करणला नेहमीच ट्रॉल केले जाते. करणवर प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांनी नुकतेच काही आरोप केले होते. करण जोहरने त्याच्यावरील आरोपांवर अखेर मौन सोडले आहे.

चित्रपट निर्मात्याने एक हिंदी कविता ऑनलाइन शेअर करून त्याच्यावर आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. कविताच्या माध्यमातून त्यांनी नुकत्याच झालेल्या आरोपांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नसल्याचे सूचित केले आहे.

शनिवारी एक थ्रोबॅक व्हिडिओ समोर आल्यानंतर करण जोहरने बॉलीवूडमधील त्याच्या निंदकांना प्रत्युत्तर दिले. खरं तर, या व्हायरल व्हिडिओमध्ये तो अभिनेत्री अनुष्का शर्माचे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवण्यात आले होते. तर अभिनेत्री कंगना रनौत, चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री आणि लेखक-दिग्दर्शक अपूर्व असरानी यांनी 2016 मध्ये करण जोहरच्या एका पॅनेलवरील कमेंट करत प्रतिक्रिया दिली होती.

करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर त्याच्यावरील आरोपांवर लिहिले, "लगा लो इल्ज़ाम, हम झुकने वालों में से नहीं.., झूट का बन जाओ गुलाम...., हम बोलने वालों में से नहीं..., जितना नीचा दिखाओगे..., जितने आरोप लगाओगे... , हम गिरने वालों में से नहीं..., हमारा करम हमारा विजय है...आप उठा लो तलवार... हम मरने वालों में से नहीं...।

प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये जाण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. एका पॉडकास्टमध्ये तिने सांगितले की, तिला बॉलिवूडमधून दूर करण्यात आले होते. प्रियांकाच्या पॉडकास्टनंतर अनुष्का शर्माचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये अभिनेत्रीने शेअर केले की, तिला बॉलिवूडने टार्गेट केले आहे असे वाटत आहे. तिला हवी तशी कामे मिळत नाहीत.

करण जोहरचा दिग्दर्शक म्हणून 2016 मध्ये ए दिल है मुश्किल चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याने लस्ट स्टोरीज (2018) आणि घोस्ट स्टोरीज (2020) या सेगमेंटचे दिग्दर्शन केले. करण जोहर या वर्षी रॉकी ओर राणी की प्रेमकथाच्या माध्यमातुन दिग्दर्शन दुनियेत परतत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या भूमिका आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India T20 World Cup Squad : किंग कोहलीवर विश्वास कायम, पंत आणि चहलचंही कमबॅक; टी-20 वर्ल्डकप टीमबाबत ५ महत्वाचे मुद्दे

PM Narendra Modi आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक अभिजीत पवार यांची नवी दिल्लीत भेट

Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली - कोपरदरम्यानच घटना का घडताहेत?

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

Modi VS Pawar | राजकारणातील भटकती आत्मा कोण? मोदी-पवारांमध्ये जुंपली

SCROLL FOR NEXT