Karan Johar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Karan Johar : हृतिक रोशनच्या 'वॉर 2'च्या टीझरवर करण जोहरची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?

Karan Johar Reaction on War 2 Teaser : ज्युनिअर एनटीआर आणि हृतिक रोशनच्या 'वॉर 2'चा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. टीझर पाहून करण जोहरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Shreya Maskar

काल (20 मे) साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा वाढदिवस आहे. ज्युनियर एनटीआरने आपल्या बर्थडेला चाहत्यांना मोठ गिफ्ट दिलं आहे. त्याचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट 'वॉर 2'चा (War 2 Teaser Released) टीझर रिलीज करण्यात आला. या टीझरने सोशल मीडियावरल धुमाकूळ घातला आहे.

'वॉर 2' चित्रपटात दोन सुपरस्टार आमने सामाने पाहायला मिळणार आहेत. साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर ( JR NTR ) आणि हृतिक रोशन ( Hrithik Roshan ) यांचा फुल ॲक्शन मोड टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. या टीझरचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. 'वॉर 2' हा एक ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर , हृतिक रोशनसोबत बॉलिवूडची अभिनेत्री कियारा अडवाणी ( Kiara Advani ) पाहायला मिळणार आहे.

'वॉर 2' चा टीझर पाहून दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने चित्रपटाबाबत आपले मत मांडले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून टीझरचे कौतुक आणि चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. "आणि येतोय वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर! टायटन्सची ही टक्कर EPIC ठरणार आहे आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे! मी चित्रपट पाहण्यासाठी खरोखर वाट पाहू शकत नाही!"

karan johar

करण जोहरने (Karan Johar) 'वॉर 2' चित्रपटाचे आणि सिनेमातील कलाकारांचे तोंड भरून कौतुक केले आहे. टीझरमधील कियारा अडवाणीच्या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'वॉर 2' चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपट हिंदी, तमीळ व तेलुगू या भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात हृतिक रोशन मेजर कबीर धालीवालच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात हृतिक आणि कियारा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

'वॉर 2' रिलीज डेट

ज्युनिअर एनटीआर, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणीचा 'वॉर 2' चित्रपट 14 ऑगस्ट ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'वॉर 2' हा चित्रपट टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांच्या 2019 साली रिलीज झालेल्या 'वॉर' चा सिक्वेल आहे. चाहते देखील 'वॉर 2'च्या टीझरचे कौतुक करत आहे. तर चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT