karan johar & Ram charan & Allu arjun Saam Tv
मनोरंजन बातम्या

Karan Johar : मिशन ₹ 5000 कोटी! पुष्पा २, RRR ला सुद्धा मागे टाकणार; करण जोहरचा जबरदस्त प्लान?

Karan Johar : साऊथच्या सुपरस्टार्स अल्लू अर्जुन आणि राम चरण प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. त्यामुळे आता करण जोहरही अल्लू अर्जुन आणि राम चरण यांच्यासोबत चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Allu Arjun And Ram Charan : अल्लू अर्जुन एकटाच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. आता विचार करा जरा, RRR चा राम चरण देखील त्याच्यासोबत त्याच चित्रपटात आला तर काय होईल? चित्रपट इतके पैसे कमावेल की चित्रपट निर्माते श्रीमंत होतील. हेच स्वप्न डोळ्यासमोर ठेवून बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या आगामी चित्रपटाचे नियोजन करत आहे. त्याला अल्लू अर्जुन आणि राम चरण यांना पॅन इंडिया चित्रपटात एकत्र कास्ट करायचे आहे.

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपट 2000 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. त्याच वेळी, राम चरणच्या आरआरआरने 1200 कोटींची कमाई केली होती. या दोघींची जोरदार चर्चा आहे, त्यामुळे करण जोहर एकही संधी सोडू इच्छित नाही. नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार ऍटली या दोघांना घेऊन चित्रपट करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे आता कारण जोहरने देखील हीच इच्छा व्यक्त केली आहे.

करण जोहरचे नियोजन काय आहे?

'RRR' आणि 'पुष्पा 2' नंतर अल्लू अर्जुन आणि राम चरणचे यश गगनाला भिडले आहे. एकीकडे 1000 कोटींची कमाई आणि दुसरीकडे जागतिक स्तरावर प्रसिद्धी या दोघांनीही चाहत्यांच्या हृदयात आपले स्थान कायम ठेवले आहे. अशा परिस्थितीत करण जोहरने अल्लू अर्जुन आणि राम चरण यांच्यासोबत मल्टीस्टारर चित्रपटाची योजना आखली आहे. करण जोहरचे संपर्क किती मजबूत आहेत हे तुम्हाला माहीत आहे. अशा परिस्थितीत तो या पॅन इंडिया चित्रपटासाठी संपूर्ण मेहनत करत आहे. एवढेच नाही तर अल्लू अर्जुन आणि राम चरण यांच्या पॅन इंडिया चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी ऍटली यांना घेण्याची योजना आहे. ॲटलीने शाहरुख खानचा 'जवान' करण जोहरला आवडला होता. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

भाऊ-भाऊ एकत्र, ५ हजार कोटींची तयारी !

नुकताच मेगास्टार चिरंजीवी अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला होता. अल्लू अर्जुन आणि राम चरण चुलत भाऊ आहेत. एवढेच नाही तर अल्लू अर्जुनने राम चरणच्या येवडू या चित्रपटात याआधी कॅमिओ केला आहे.

या चित्रपटाबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. कधी बनणार, बनणार की नाही? पण चाहत्यांना कारण जोहरकडून खूप अशा आहेत. जर हा चित्रपट झाला तर 5000 कोटींची कमाई हा चित्रपट करेल असे चाहते अटकळ लावत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT