Rocky Aur Raani Ki Prem Kahani Cast Fees  Instagram
मनोरंजन बातम्या

Rocky Aur Rani Ki Prem Kahani बिग बजेट चित्रपटातील कलाकरांचे मानधनही आहे बक्कळ; आकडा पाहून थक्क व्हाल

Pooja Dange

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Cast Fees : करण जौहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचा नुकतीच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, जया बच्चन अशी तगडी कास्ट पाहायला मिळत आहे.

रणवीर-आलियाची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याआधी हे दोघे 'गली बॉय' या चित्रपटात एकत्र दिसले होते. चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप चर्चा आहे. जया बच्चन,धर्मेंद्र या दिग्गज कलाकारांना खूप दिवसांनी मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

धर्मा प्रोडक्शन निर्मित रॉकी और रानी की कहानी हा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या बिग बजेट फिल्मची स्टारकास्ट देखील बिग बजेट आहे. तर या कलाकारांचे मानधनही तितकेच भरभक्कम आहे. पाहूया या चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन घेतले आहे.

रणवीर सिंग

रणवीर सिंग बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. यााधीही करण जौहरच्या चित्रपटात रणवीर सिंग दिसला होता. या चित्रपटात रणवीर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रणवीर चित्रपटात रॉकी हे पात्र साकारणार आहे. सध्या रणवीरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करत नसले तरी प्रेक्षकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी रणवीरने २५ कोटींचं मानधन घेतले आहे.

आलिया भट्ट

आलिया ही बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे. आलियाने बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत आलिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात आलिया राणी हे पात्र साकारणार आहे. रिपोर्टनुसार, आलियाने चित्रपटासाठी १० कोटींचं मानधन घेतले आहे.

धर्मेंद्र

एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारे धर्मेंद्र खूप दिवसांनी चित्रपटात दिसणार आहे. धर्मेंद्र यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असल्याचं दिसत आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटासाठी धर्मेंद्रनी १ कोटींचे मानधन घेतलं आहे.

जया बच्चन

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांनी मन जिंकणाऱ्या जया बच्चन या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटातून गायब झालेल्या जया बच्चन पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटासाठी जया बच्चन यांनी १ कोटींचं मानधन घेतल्याची माहिती आहे.

शबाना आझमी

चित्रपटात एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी शबाना आझमी तयार आहेत. रिपोर्टनुसार, शबाना आझमी यांनी १ कोटींचं मानधन घेतल्याचं समजत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप

IND vs BAN 1st T20I: टीम इंडियाची यंगिस्तान जोमात! हार्दिकचा फिनिशिंग टच अन् बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय

SCROLL FOR NEXT