Changed Aialogues Won't Help Adipurush : ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरूष' चित्रपटाला सोशल मीडियावर भरपूर ट्रोल करण्यात येत आहे. चित्रपटावर सर्वच क्षेत्रांतून टीका होत आहे. चित्रपटाच्या व्हीएफएक्स आणि डायलॉगवरून वाद सुरू आहे.काही दिवसांपूर्वी 'रामायण' मालिकेतील कलाकारांनी चित्रपटावर टीका केली होती. आता 'महाभारत' या मालिकेत युधिष्ठिराची भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहाना यांनी चित्रपटावर टीका केली आहे.
गजेंद्र चौहान हे फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे माजी चेअरमॅन होते. त्यांनी बी.के चौप्रा निर्मित महाभारत मालिकेत काम केले होते. त्यांनी चित्रपटावर सडकून टीका केला आहे. चित्रपटाच्या बदललेल्या डायलॉगवर मत मांडत गजेंद्र चौहान यांनी लेखकावर टीका केली आहे. (Latest Entertainment News)
तिकीट विकत घेऊनही, मी चित्रपट पाहिला नाही...
इंडिया टूडेशी बोलताना गजेंद्र म्हणाले, "मी चित्रपटाचे तिकीट विकत घेऊनही चित्रपट पाहिला नाही. हा चित्रपट मी चित्रपटगृहात जाऊन पाहाव हे माझ्या विवेकबुद्धीला पटण्यासारखे नव्हते. चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपटाचे काही व्हिडिओ पाहिल्यानंतर चित्रपट पाहण्यालायक नाही हे माझ्या लक्षात आले.
मी चित्रपट पाहून माझ्या श्रद्धांशी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही". चित्रपटाच्या डायलॉगविषयी बोलताना ते म्हणाले, "चित्रपटतील डायलॉग आता बदलून काहीच फायदा नाही. जे नुकसान व्हायचं होतं ते आधीच झाले आहे.त्यामुळे आता बदल करून काहीच फायदा नाही".
"हे पाहा, धनुष्यबानातून बाण आधीच निसटला आहे. जे काही नुकसान व्हायचं होतं ते आधीच झाले आहे. तुम्ही कितीही सुधारणा केली तरी काहीच बदल होणार नाही. त्याचा फायदा होणार नाही. लोकांनी आधीच चित्रपटाच्या निर्मात्यांना शिक्षा दिली आहे.
चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई पाहा आणि आजची कमाई पाहा. खूप फरक पडला आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला नाकारले आहे. ते शिक्षेस पात्र होते आणि प्रेक्षकांनी चित्रपटाला नाकारून शिक्षा दिली आहे. आदिपुरूष चित्रपट दाखवायलाच जाऊ नये. सरकाने चित्रपटावर बंदी घालायला हवी" अशा शब्दात चित्रपटाच्या बदललेल्या डायलॉगवर गजेंद्र चौहान यांनी भाष्य केले आहे.
लेखक बिनडोक आहे...
गजेंद्र चौहानांनी चित्रपटाचे लेखक मनोज मुंताशिर यांच्यावर सडकून टीका केली आहे. "लेखकाने डायलॉगमधून जगाला अज्ञानाची ओळख करून दिली. त्याला अक्कल नाही. तो गीतकार आहे आणि त्याला चित्रपटाचं लेखन करायला लावलं हेच चुकलं." गजेंद्रनी मनोज यांच्यावर टीका करायची एकही संधी सोडली नाही. ते म्हणाले, "मनोजने सोशल मीडियावरच्या व्हिडिओमधून डायलॉग्स एकत्र करून संवाद लिहला आहे. कुमार विश्वास यांच्या 'मैं तुम्हारी लंका को आग लगा दुंगा' असे डायलॉग एकत्र करून चित्रपटाचे लेखन केले आहे".
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.