Tujhe Yaad Na Meri Aayee New Version Announcement Instagram
मनोरंजन बातम्या

Tujhe Yaad Na Meri Aayee 2.0 News: ‘तुझे याद ना मेरी आई’ या गाण्याचं रिमिक्स न्यू व्हर्जन येणार, राहुल, अंजली आणि टीनाचा लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार

Tujhe Yaad Na Meri Aayee Song New Version: ‘कुछ कुछ होता है’ मधलं ‘तुझे याद ना मेरी आई’ या गाण्याचं रिमिक्स न्यू व्हर्जन येणार असल्याचं सांगितलं.

Chetan Bodke

Tujhe Yaad Na Meri Aayee New Version Announcement

शाहरुख आणि काजोलच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाची आजही क्रेझ आहे. चित्रपटातील सीन्स, डायलॉग्ज आणि गाण्यांनी चाहत्यांनी अक्षरश: वेड लावलं आहे. जरी ही हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्ष उलटले असले तरी, सुद्धा हा चित्रपट त्याच आवडीने आजही पाहिला जातो.

१९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केलं आहे. या चित्रपटाबद्दल करणने चाहत्यांना एक महत्वाची अपडेट दिली आहे. दिग्दर्शकाने चित्रपटातील एका गाण्यावर रिमिक्स व्हर्जन करण्याचं ठरवलंय.

सोशल मीडियावर दिग्दर्शकांनी पोस्ट करुन ‘कुछ कुछ होता है’ मधलं ‘तुझे याद ना मेरी आई’ या गाण्याचं रिमिक्स न्यू व्हर्जन येणार असल्याचं सांगितलं. करण जोहरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबतची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. रिमिक्स व्हर्जन लवकरच येणार असून व्हर्जन २.० असं पोस्टरवर लिहिलं आहे. पण जरीही असं असलं तरी देखील नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

गाण्याच्या नव्या व्हर्जनबद्दल माहिती समोर येताच, नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. बी प्राकच्या आवाजामध्ये हे गाणं ऐकायला मिळणार म्हणून चाहते उत्सूक आहेत. तर काहींनी करण जोहरवरच टीका करण्यास सुरुवात केली आहे. करणला यावेळी अनेक नेटकऱ्यांनी त्याला जुने गाणे खराब न करण्याचा योग्य सल्ला दिला आहे. आता हे गाणे प्रेक्षकांच्या पसंती पडते की नाही हे रिलिज झाल्यानंतरच कळेल.

चित्रपटामध्ये राणी मुखर्जी, काजोल देवगण आणि शाहरुख खान हे तिघेही प्रमुख भूमिकेत आहेत. ते गाणं उडित नारायण, अल्का यागनिक आणि मनप्रीत अख्तर या प्रसिद्ध संगीतकारांनी गाणं गायलं आहे. तर आता ‘तुझे याद ना मेरी आई’ चं नवं व्हर्जन बी प्राक यांनी गायलं आहे. अद्याप त्या न्यू व्हर्जनची घोषणा झाली असून प्रदर्शनाची तारीख गुलदस्त्यातच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT