Raju Shrivastav News
Raju Shrivastav News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raju Shrivastav: आज पहिल्यांदाच तुम्ही... विनोदवीराच्या निधनानंतर कपिल शर्मा भावूक; पोस्ट व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन (Comedian) राजू श्रीवास्तव यांचं बुधवारी वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. सुमारे महिनाभर ते रुग्णालयात दाखल होते. सर्वांना हसवणारे राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने मनोरंजन जगतासह संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांसह अनेक मनोरंजन विश्वातील दिग्गज त्याच्या विषयीच्या आठवणी शेअर करत आहे. दरम्यान, कॉमेडी किंग कपिल शर्माने मित्र राजू श्रीवास्तव यांच्या सोबतचे खास क्षण सोशल मीडियावर(Social Media) शेअर करत दुःख व्यक्त केले आहे.

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर कपिल शर्माने सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. कपिल शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर राजू श्रीवास्तव सोबतचा फोटो शेअर केला आहे. यासह कपिलने 'कायमच जगाला खळखळून हसवणाऱ्या या विनोदवीराने आज पहिल्यांदा तुम्ही आम्हाला रडवले राजू भाई, यार! अजून एकदा भेट झाली असती, अशी खंत व्यक्त केली आहे. तुमची खूप आठवण येईल. अलविदा, ओम शांती.' असे म्हणत हृदय पिळवणून टाकणारा लव्ह इमोजी कॅप्शन दिला आहे.

कपिलने राजूच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. राजू श्रीवास्तव हे मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय नाव होते, आपल्या जबरदस्त कॉमेडीने संपूर्ण देशाला हसवले होते. १० ऑगस्ट २०२२ रोजी राजूला हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्लीतील एका जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआऊट करताना राजू श्रीवा खाली कोसळले होते. त्यानंतर त्याना रूग्णालयात नेण्यात आले होते. मागील एक महिन्यापासून त्याच्याव उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान बुधवारी या प्रसिद्ध विनोदवीराने जगाचा निरोप घेतला.

Edited By- Mansvi Choudhary

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

Kalyan Lok Sabha: मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी पंतप्रधान मैदानात! श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची होणार सभा

Shani Dosh: तुम्हाला नेहमी अडचणी येतात? 'हे' आहेत शनिदोषाची लक्षणं

Today's Marathi News Live : मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावमधील सभेला कर्नाटक सरकारची परवानगी

SCROLL FOR NEXT