Prakash Raj: सिनेमात खलनायक; रियल लाईफमध्ये ठरला नायक, या गावाचा केला कायापालट

प्रत्येक चित्रपटात त्याची खलनायकाची भूमिका लक्षवेधी ठरते. पण खऱ्या आयुष्यात तो सर्वसामान्यांसाठी एक हिरो पेक्षा कमी नाही.
Prakashraj Tweet
Prakashraj TweetTwitter/ @m_madhu1973
Published On

मुंबई: कोरोनाने (Covid19) सर्वांनाच सळो की पळो करुन सोडले होते. त्या काळात बऱ्याच जणांना नोकरी गमवावी लागली. त्यामुळे बरेच जण आपल्या गावी परतले. कोरोना काळात प्रत्येकासाठी अभिनेता सोनू सुद गरजू लोकांच्या मदतीला धावून गेला होता. तसेच आणखी एका कलाकाराने (Bollywood Actor) अशीच लोकांना मदत करून चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले. प्रत्येक चित्रपटात त्याची खलनायकाची भूमिका लक्षवेधी ठरते. पण खऱ्या आयुष्यात तो सर्वसामान्यांसाठी एक हिरो पेक्षा कमी नाही. हा कलाकार आहे सिंघम चित्रपटातील जयकांत शिकरे म्हणजे प्रकाश राज (Prakash Raj).

Prakashraj Tweet
Raju Srivastava : राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार

प्रकाश राजने रियल आयुष्यात केलेल्या कामांमुळे बराच चर्चेत आहे. प्रकाशने तेलंगणा (Telangana) राज्यातील एक गाव दत्तक घेत गावाचा विकास केला. मोठ मोठ्या शहरांमध्येही आपण जसे रस्ते नाही पाहिलेत, तसेच रस्ते तेलंगणातील गावात बघायला मिळत आहेत. रेड्डीपल्ली केशमपट या गावाचे प्रकाश राज यांनी कायापालट केला आहे. त्यांच्या या कामाचे सर्वच स्तरातून कौतूक केले जात आहेत. गावतील फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

Prakashraj Tweet
'बिग बॉस' फेम तेजस्वी प्रकाशचे गोव्यात घर; बॉयफ्रेडनंच दिली 'ही' माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com