Kapil Sharma Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma: कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे'जवळ चौथ्यांदा गोळीबार; बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

Kapil Sharma: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅनडातील कॅफेवर चौथ्यांदा गोळीबार झाला. लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी घेत धमकी दिल्याने पुन्हा सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Shruti Vilas Kadam

Kapil Sharma: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’ परिसरात पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही गेल्या वर्षभरातील चौथी घटना असल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, २ मे रोजी कॅनडातील सरे (Surrey) परिसरात कॅप्स कॅफेजवळील एका रेस्टॉरंटवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारल्याचे समोर आले आहे. हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत या गँगने कपिल शर्मा यांना उघड धमकी दिल्याचेही वृत्त आहे.

Kapil Sharma

विशेष म्हणजे, हा गोळीबार थेट कॅफेवर नसून शेजारील ‘चाय सुत्ता बार’ या ठिकाणी करण्यात आला. मात्र हे ठिकाण कपिल शर्माच्या कॅफेजवळ असल्याने त्याला टार्गेट केले जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही २०२५ पासून या कॅफे परिसरात तीन वेळा अशाच प्रकारचे हल्ले झाले होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये गँगकडून “लाइनवर या” असा इशारा देत भविष्यात आणखी गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. काही अहवालांनुसार, कपिल शर्मा यांच्या मुंबईतील घरालाही लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे, मात्र याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

कपिल शर्माच्या करियरबद्दल

सध्या नेटफ्लिक्सवर कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा चौथा सीझन सुरु आहे. दरम्यान, त्याचा 'किस किसको प्यार करूँ २' हा चित्रपट काही काळापूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT