Ranveer Singh saam tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh: रणवीर सिंगच्या अडचणी संपेना; आता हायकोर्टाकडून नवा आदेश, नेमकं काय घडलं?

Ranveer Singh Kantara Controversy: बॉलिवूड स्टार रणवीर सिंगच्या 'कांतारा'ची नक्कल करण्यावरून सुरू असलेला वाद वाढला आहे. या संदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन खटल्याबाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे.

Shruti Vilas Kadam

Ranveer Singh Kantara Controversy: बॉलिवूडचा स्टार रणवीर सिंग सध्या चर्चेत आहे. त्याचा चित्रपट 'धुरंधर २' (Dhurandhar 2) ने अनेक रेकॉर्ड ब्रेक करत बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. त्यामुळे सगळीकडे त्याचं कौतुक होत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला रणवीर सिंग कायदेशीर अडचणीत सापडला आहे. 'कांतारा' (Kantara) या चित्रपटातील एका सीनची नक्कल केल्याप्रकरणी या अभिनेत्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेनंतर, आता या एक नवीन अपडेट समोर आले आहे.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद न्यायालयात सादर

या प्रकरणावर नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान, रणवीर सिंगच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील साजन पुवय्या यांनी न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या एकलपीठाला माहिती दिली की, प्रतिज्ञापत्र (माफीनामा) यापूर्वीच दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, या प्रतिज्ञापत्रात अभिनेत्याने मंदिराला भेट देऊन दर्शन घेण्याचा आपला इरादाही व्यक्त केला आहे. मात्र, तक्रारदाराच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, हे प्रतिज्ञापत्र स्पष्ट नाही आणि त्यातून कोणत्याही प्रकारचा खरा पश्चात्ताप दिसून येत नाही. वकिलांनी निदर्शनास आणून दिले की, अभिनेत्याचे खरे हेतू या प्रतिज्ञापत्रातून स्पष्टपणे समजत नाहीत. त्यामुळे तक्रारदाराने अधिक स्पष्ट आणि सविस्तर माफीची मागणी केली आहे.

रणवीर सिंगला पुन्हा माफी मागणे आवश्यक

यावर उत्तर देताना, पुवय्या यांनी प्रतिज्ञापत्रातील विशिष्ट परिच्छेदांचा संदर्भ दिला. त्यामध्ये रणवीर सिंगने असे म्हटले आहे की, त्याने केलेल्या नक्कलमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील याची त्याला अजिबात कल्पना नव्हती आणि त्याने या संपूर्ण घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं होतं. त्यांनी पुढे असेही सांगितले की, रणवीर सिंगने यापूर्वीच बिनशर्त माफी मागितली आहे. असे असूनही, तक्रारदाराच्या वकिलांनी अणखी एक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आग्रह धरला. रणवीरच्या वकिलांनी न्यायालयाला आश्वासन दिले की, ते तक्रारदाराशी चर्चा करून एक सुधारित प्रतिज्ञापत्र तयार करतील. जे त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करेल.

प्रकरणाची पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २३ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. तसेच, तक्रारदाराचे समाधान होईल अशा प्रकारे सुधारित प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

संपूर्ण प्रकरण काय?

गेल्या वर्षी गोव्यात आयोजित ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान, रणवीर सिंगने मंचावर असताना ऋषभ शेट्टीच्या उपस्थितीत 'कांतारा'चे कौतुक करताना त्यात दाखवण्यात आलेल्या 'दैव'ची विचित्र प्रकरे नक्कल करत त्याला लेडी भूत असे म्हणाला. हा प्रकार लोकांना आवडला नाही आणि सोशल मीडियावर त्याच्यावर ट्रोलिंग होऊ लागली. तसेच अभिनेत्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला. अभिनेत्याने आपल्या कृतीबद्दल नंतर माफी मागितली. पण तरीही त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. अभिनेत्यावर केलेल्या तक्रारीच्या आधारे कलम १९६, २९९ आणि ३०२ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा समाजाला आरक्षण मनोज जरंगे यांच्यामुळे मिळालं - प्रसाद लाड

Shocking : नवऱ्यापासून घटस्फोट घेतला, मावशीच्या मुलासोबत रिलेशनमध्ये आली; बॉयफ्रेंडने असं काही केलं की महिला हादरून गेली

Kangana Ranaut Wedding : कंगना रणौतनं गुपचूप लग्न केलं? गळ्यात मंगळसूत्र अन् हातात हिरव्या बांगड्या; 'त्या' फोटोने उडवली खळबळ

वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू; महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भयानक घटना

डायबिटीजवर तगडा उपाय, हे ७ मसाले झटक्यात कमी करतील रक्तातील साखर

SCROLL FOR NEXT