Kantara Chapter 1 Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Kantara Chapter 1 Box Office Collection Day 7 : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाने एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने सात दिवसांत किती कोटीची कमाई केली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'कांतारा चॅप्टर 1' चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे.

'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटात मुख्य भूमिकेत सुपरस्टार ऋषभ शेट्टी आहे.

'कांतारा चॅप्टर 1'ने भारतात 300 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara Chapter 1) चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे. 'कांतारा चॅप्टर 1' चे दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केले असून मुख्य भूमिकेत देखील तो झळकला आहे. चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. चित्रपटाने एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटाचे सातव्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'कांतारा चॅप्टर 1' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 7

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर 1' ने सातव्या दिवशी 25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 316 कोटी रुपये झाले आहे.

  • दिवस पहिला - 61.85 कोटी रुपये

  • दिवस दुसरा- 45.4 कोटी रुपये

  • दिवस तिसरा- 55 कोटी रुपये

  • दिवस चौथा- 63 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 31.25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 33.5 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 25 कोटी रुपये

  • एकूण - 316 कोटी रुपये

'कांतारा चॅप्टर 1' ने 'कांतारा'चा विक्रम मोडला

'कांतारा चॅप्टर 1'ने जगभरात जवळपास 400 कोटी रुपयांच्यावर व्यवसाय केला आहे. 'कांतारा चॅप्टर 1' सात दिवसांत भारतात 316 कोटी रुपयांची कमाई केली. 'कांतारा चॅप्टर 1'चा पहिला भाग 'कांतारा' 2022 मध्ये रिलीज झाला. मीडिया रिपोर्टनुसार, 'कांतारा'ने पहिल्या आठवड्यात 309 कोटींची कमाई केली होती. 'कांतारा चॅप्टर 1' 2025 चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला आहे.

'कांतारा चॅप्टर 1' इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलुगू, मल्याळम, तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटात ऋषभ शेट्टीसोबत रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया, जयराम हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाईकच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? 99% तुम्हाला माहिती नसेल उत्तर

Maharashtra Live News Update: परवाना पोलीस आयुक्तांच्या स्वाक्षरीने मिळतो - योगेश कदम

Shocking: शाळेमध्ये २ विद्यार्थ्यांची आत्महत्या, गळफास घेत संपवलं आयुष्य; पालघर जिल्हा हादरला

Lack of sleep: नीट झोप होत नाही! आरोग्यासाठी ठरतेय सर्वात घातक, संशोधनातून समोर आली झोप उडवणारी माहिती

नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव देण्याच्या भाजपमध्ये हालचाली; राऊतांच्या दाव्यानं खळबळ | VIDEO

SCROLL FOR NEXT