दाक्षिणात्य सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे ४६ व्या वर्षी निधन Saam Tv
मनोरंजन बातम्या

दाक्षिणात्य सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे ४६ व्या वर्षी निधन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कन्नड सिनेसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेना पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कन्नड चित्रपटसृष्टीमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांने अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपट सृष्टीवर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.पुनीत यांना आज दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.

हे देखील पहा-

यानंतर त्यांना तातडीने बंगळुरुमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात आयसीयू उपचार सुरु होते. रुग्णालयात डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर कायम नजर ठेवून होते. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली होती. बंगळुरु मधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान त्यांच्या मागे पत्नी आणि २ मुली असा परिवार आहे.

पुनीत राजकुमार यांच्या निधनाविषयी रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यांच्या निधनानंतर कन्नड सिनेसृष्टीसह बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. बॉलिवूड मधील अनेक कलाकार, दिग्दर्शक, क्रिकेटपटू यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार देखील मिळाला आहे. पुनीत हे २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अप्पू या चित्रपटात ते प्रसिद्धी झोतात आले. त्याने आतापर्यंत कन्नड मधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभि, वीरा कन्नडिगा, अजय, अरासू, राम, हुदुगारू आणि अंजनी पुत्र या चित्रपटात काम करण्यात आले आहे.

Edited By- Digambar jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाशिम दौरा रद्द

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने फडणवीस यांना पत्राद्वारे केली मोठी मागणी

SCROLL FOR NEXT