Famous Actress SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : मुलीसाठी बापाने हद्द पार केली; लोकप्रिय अभिनेत्रीचं केलं अपहरण, धमकी दिली अन्..., वाचा नेमकं प्रकरण

Famous Actress Kidnapped By Her Husband : प्रसिद्ध अभिनेत्रीला तिच्या नवऱ्याने किडनॅप केले. काही काळापूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

लोकप्रिय अभिनेत्रीचे नवऱ्यानेच अपहरण केले.

मतभेदांमुळे काही महिन्यांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता.

नवऱ्याने अभिनेत्रीला मैसूरला बोलावून तिला किडनॅप केले.

मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नडमधील लोकप्रिय अभिनेत्रीचे तिच्या नवऱ्यानेच अपहरण केले. टिव्ही मालिका आणि चित्रपटांमधून अभिनेत्री चैत्राने आपल ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीची बहीण लीला आर.ने पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधित तक्रार दाखल केली आहे. बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, चैत्रा आणि तिच्या नवऱ्यामध्ये 7-8 महिने मतभेद होते. ज्यामुळे त्यांनी घटस्फोट घेतला.

चैत्राच्या नवऱ्याचे नाव हर्षवर्धन आहे. जो हासन येथे राहत होता. तर चैत्रा आणि त्यांची एक वर्षाची मुलगी भाड्याच्या घरात राहत होते. हर्षवर्धनला आपल्या मुलीचा ताबा हवा होता. मात्र तो मिळाला नसल्यामुळे त्याने अभिनेत्रीला किडनॅप केलं. 2023 मध्ये हर्षवर्धन आणि चैत्राने लग्नगाठ बांधली. मात्र कालांतराने त्यांच्यात मतभेद झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. 7 डिसेंबरला चैत्राने मैसूरला शूटिंगसाठी जाते असे सांगून घर सोडले. मात्र चैत्राला मैसूरला बोलवणे हा हर्षवर्धनचा प्लान होता.

हर्षवर्धनने आपल्या मित्राच्या मदतीने चैत्राला किडनॅप केले. हर्षवर्धनने त्याच्या सहकाऱ्याला 20 हजार रुपये दिले. त्या व्यक्तीने चैत्रला सकाळी 8 वाजता म्हैसूर रोड मेट्रो स्टेशनवर बोलावले आणि जबरदस्तीने तिला नाइस रोड आणि बिदादी रोड मार्गे कारमधून नेण्यात आलं. असे अभिनेत्रीच्या बहिणीने सांगितले.

चैत्राने सकाळी 10.30 च्या सुमारास ही माहिती आपल्या गिरीश नावाच्या मित्राला दिली आणि त्याने सर्व चैत्राच्या कुटुंबाला सांगितले. त्यानंतर चैत्राच्या आईला हर्षवर्धनचा फोन आला आणि त्याने कबुल केले की, मी चैत्राला किडनॅप केले आहे. हर्षवर्धनने आईला धमकी दिली की, "माझ्या मुलीला सांगितलेल्या ठिकाणी आणा नाहीतर चैत्राला सोडणार नाही..." अशी सर्व गोष्ट तक्रारीत सांगण्यात आली आहे.

हर्षवर्धन हा 'वर्धन एंटरप्रायझेस'चा मालक आणि चित्रपट निर्माता आहे. हर्षवर्धनने मुलीला अर्सिकेरे या ठिकाणी घेऊन येण्यास सांगितले. तक्रारदाराने सांगितले की, जेव्हा कुटुंबाने चैत्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा फोन बंद होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra: वर्षभर शाळेतच नाहीत,७ शिक्षकांनी फुकटाचा पगार घेतला, महाराष्ट्रातील धक्कादायक वात्सव

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Mobile WiFi: घराबाहेर पडताच मोबाइलचा वायफाय बंद करा, अन्यथा डोकं झोडून घ्यावं लागेल! कारण काय?

Mulshi Crime: मुळशीत पाय ठेवायचा नाही, नाहीतर तुझा मुळशी पॅटर्न करेन; पुण्यातील व्यावसायिकाला धमकी

Akshaye Khanna : 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्ना पोहचला अलिबागला; घराची केली वास्तुशांती, VIDEO होताय व्हायरल

SCROLL FOR NEXT