Manasvi Choudhary
कर्नाटक हे दक्षिण भारतातील एक मुख्य राज्य आहे.
कर्नाटक राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ मध्ये झाली.
कर्नाटकाचे सुरूवातीचे नाव म्हैसूर असे होते मात्र १९७३ मध्ये बदलून कर्नाटक असे झाले.
कर्नाटक हे नाव कर्नाट शब्द आणि नाडू या दोन शब्दांनी बनले आहे.
कर्नाटकचा मोठा भाग दख्खनच्या पठारावर वसलेला आहे.
याच दख्खनच्या पठारावरील स्थानामुळे कर्नाटक हे नाव पडले.
कन्नडमध्ये या नावाचा अर्थ 'काळ्या मातीची जमीन' असा देखील होतो.