Dileep Raj passes away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Famous Actor Death: कन्नड अभिनेते आणि निर्माते दिलीप राज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Shruti Vilas Kadam

Famous Actor Death: कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते दिलीप राज यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण कन्नड मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे दिलीप राज यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. त्यानंतर त्यांना तातडीने बंगळुरूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

दिलीप राज यांनी कन्नड चित्रपट, मालिका आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अभिनेता म्हणून त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले. विशेषतः मिलान या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटात त्यांनी दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय त्यांनी ‘यू-टर्न’, ‘बॉयफ्रेंड’ यांसारख्या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. दूरदर्शन विश्वातही ‘हिटलर कल्याण’, ‘जननी’, ‘रंगोली’ आणि ‘कुंकुम भाग्य’ यांसारख्या मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

अभिनयासोबतच दिलीप राज हे निर्माते आणि डबिंग कलाकार म्हणूनही काम करत होते. त्यांनी स्वतःच्या निर्मिती संस्थेमार्फत काही लोकप्रिय कार्यक्रमांची निर्मिती केली होती. रंगभूमीशी त्यांचे विशेष नाते होते आणि अभिनयाची सुरुवात त्यांनी नाट्यसंस्थांमधूनच केली होती. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Fact Check: दारूच्या एका बाटलीवर दुसरी बाटली फ्री? दारूच्या फ्री बॉटलसाठी दुकानांबाहेर रांगा

जमीन हादरली, घरं थरथरली; पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

बनावट औषधांविरुद्ध एफडीएची मोठी कारवाई; चार महिन्यांत ४,२५६ ठिकाणांवर धाडी, १९ कोटींचं औषधं जप्त

विद्यार्थ्यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी

Maharashtra News Live Update: उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT