Nitin Gopi Passes Away Age Of 39 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nitin Gopi Due To Heart Attack: साऊथ इंडस्ट्रीला मोठा धक्का, ३९ वर्षीय अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन...

Nitin Gopi Passes Away Age Of 39: अभिनेते नितीन गोपी यांचे शुक्रवारी सकाळी वयाच्या ३९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Chetan Bodke

Actor Nithin Gopi Passes Away Due To A Heart Attack: कन्नड टेलिव्हिजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अभिनेते नितीन गोपी यांचे शुक्रवारी सकाळी वयाच्या ३९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीनला त्याच्या राहत्या घरीच हृदयविकारचा तीव्र झटका आला होता. अचानक अभिनेत्याला बेंगळुरू येथील घरी असताना छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. (Tollywood)

नितीन गोपीचे घर बंगळुरूच्या इट्टामाडू येथे आहे. २ जून २०२३ रोजी त्यांची प्रकृती उत्तम होती. मात्र अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले. लगेचच नातेवाईकांनी अभिनेत्याला रूग्णालयात तात्काळ हलवले. पण उपचारादरम्यान अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे. नितीन यांच्या अचानक एक्झिटने चाहत्यांसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला दु:ख झाले आहे. (Entertainment News)

नितीन गोपी यांनी कन्नड इंडस्ट्रीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तो केवळ टीव्हीच नाही तर चित्रपटांमध्येही उत्तम काम करत आहे. 'हॅलो डॅडी'मधून त्याला इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळाली. (Bollywood Actor)

याशिवाय नितीनने 'केरला केसरी', 'मुथिनंथा हेंदती', 'निशब्द' आणि 'चिरबंधव्या' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते. अवघ्या 39 वर्षातच अभिनेत्याने आपले स्थान चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे. पण अभिनेत्याच्या अचानक एक्झिटने दाक्षिणात्य इंडस्ट्रितील स्टार हिरावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT