Nagabhushana Arrested Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nagabhushana Arrested: साऊथ अभिनेत्याच्या कारने दोघांना चिरडलं, महिलेचा जागीच मृत्यू; नागभूषणला अटक

Nagabhushan Car Hits Couple: या अपघातामध्ये महिलचा जागीच मृत्यू झाला तर तिचा तिचा पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Priya More

Nagabhushan Car Hits Couple:

कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागभूषणच्या ( Actor Nagabhushan) कारने दाम्पत्यांना चिरडल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी अभिनेत्याविरोधात बंगळुरू पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. बंगळुरूमध्ये एका जोडप्याला अभिनेत्याच्या कारने धडक दिली. हे जोडपे रस्त्याच्या कडेला पायी चालत जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला. तर तिच्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी बंगळुरूमधील कुमारस्वामी ट्रॅफिक पोलिसांनी अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अभिनेत्याला अटक देखील केली आहे. पोलीस तक्रारीत अपघाताचे कारण अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. बंगळुरूच्या वसंत पुरा मेन रोडवर फूटपाथवरून चालत असलेल्या जोडप्याला नागभूषणच्या कारने धडक दिली. हे जोडपे उत्तरहल्लीहून कोननकुंटेकडे जात होते.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अतिवेगात असलेल्या अभिनेत्याच्या कारने आधी जोडप्याला धडक दिली. त्यानंतर कार विजेच्या खांबाला धडकली. या अपघातात 48 वर्षीय प्रेमा या महिलेचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. त्याचवेळी प्रेमाचा पती कृष्णा (५८ वर्षे) याच्या दोन्ही पायांना, डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण त्यांची प्रकृती गंभीर आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर नागाभूषण स्वत: जखमी दाम्पत्याला रुग्णालयात घेऊन गेला. नागभूषण नुकताच 'तगारू पल्या' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नागभूषणने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'संकष्ट कारा गणपती' या चित्रपटातून केली होती. चित्रपटांव्यतिरिक्त नागभूषण हा नाट्यविश्वातही सक्रिय आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT