'त्या' बोल्ड ड्रेसमुळे कंगणा रणौत ट्रोल; टीकाकारांना दिलं 'हे' उत्तर Instagram/@kanganaranaut
मनोरंजन बातम्या

'त्या' बोल्ड ड्रेसमुळे कंगणा रणौत ट्रोल; टीकाकारांना दिलं 'हे' उत्तर

बॉलिवुड अभिनेत्री कंगणा रणौत सध्या तिच्या बोल्ड ड्रेसमुळे ट्रोल झाली आहे. या ट्रोलर्सना कंगणाने मात्र सडेतोड उत्तर दिलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवुड अभिनेत्री कंगणा रणौत सध्या तिच्या बोल्ड ड्रेसमुळे ट्रोल झाली आहे. धाकड या तिच्या आगामी चित्रपटाचे शूटींग नुकतेच पुर्ण झाले आहे. यानिमित्त एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत तिने पांढऱ्या रंगाची पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचंच ब्रालेट परिधान केलं होतं. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांकडून तिच्यावर टीका होत आहे. (Kangana Ranaut trolled because of that 'bold' dress)

हे देखील पहा -

अनेक नेटकऱ्यांनी संस्कृतीचा आणि सनातनी धर्माचा दाखला देत तिच्या या पेहरावावर आक्षेप घेतला. त्यामुळे बॉलिवुडशी पंगा घेणारी कंगणा स्वतः ट्रोल झाली आहे. एका इंस्टाग्राम यूजरने कमेंट केली की, हिंदु धर्माचा अपमान खूपच चांगल्या प्रकारे केला आहे. हिंदु धर्माबद्दल जेव्हा तुम्ही बोलायच्या तेव्हा मी तुमच्यावर गर्व करायचो, पण आता तुम्ही जे केलं ते खूपच चुकीचं केलंय. तर दुसरा यूजर म्हणाला, तू एवढा घाणेरडा ड्रेस परिधान करशील अशी अपेक्षा नव्हती कंगना.’ आणखी एक यूजर म्हणाला ‘तू स्वत:ला सभ्य सनातन महिला म्हणते, तर हे सगळं काय आहे. दोन चेहरे कोणासाठी?’ अशा शेकडो कमेंट्स आल्या आहेत.

या सर्व कमेंट्सना कंगणाने मात्र सडेतोड उत्तर दिलंय. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तिने एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात तिने एका प्राचीन काळाताल एका भारतीय महिलेचे चित्र पोस्ट केले आहे. त्यात तिने लिहिले की, “जे लोक मला सनातन धर्माबद्दल ज्ञान देत आहेत त्यांनी कृपया लक्षात घ्या तुम्ही अब्राहमिक सारखं वागत आहात.” कंगणाच्या या बोल्ड ड्रेसमुळे तिच्या समर्थकांचं मन दुखावल्या गेलं आहे.

Edited By - Akshay Basiane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परतीच्या पावसाचा धुडगूस

Raigad Shocking : रायगडमधील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीने मेहुणीच्या घरात आयुष्य संपवलं

Ladki Bahin Yojana: १२ हजार भावांनी मारला लाडकी बहिणींच्या पैशांवर डल्ला; योजनेत १६४ कोटींचा घोटाळा

Sonali Kulkarni: गुलाबी साडी अन् लाली...; सोनाली कुलकर्णीचा दिवाळी स्पेशल लुक, पाहा फोटो

Maharashtra Weather Alert: ऐन दिवाळीत पावसाने घातला धुमाकूळ; पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT