खूप कमी लोकांना असे होते की ते बेडवर गेल्यावर लगेच झोपतात. लवकर झोपी न जाण्याची समस्या Problem आजकाल सामान्य आहे. बर्याच लोकांना लवकर झोपायचे Sleep असते, परंतु सतत बाजू बदलल्यानंतरही ते सहज झोपू शकत नाहीत. अशा लोकांसाठी लंडनचे प्रसिद्ध डॉक्टर राज करण यांनी एक अनोखी युक्ती सांगितली आहे.
डॉ. राज यांनी लवकर झोपण्यासाठी सांगितलेल्या युक्तीला Trick 10-3-2-1 पद्धती म्हणतात. डॉक्टर म्हणतात की, ही पद्धत अवलंबल्याने तुमचे शरीर आपोआपच झोपते.
10-3-2-1 युक्ती समजावून सांगत असताना, डॉ. राज यांनी सांगितलं की, '१० म्हणजे झोपण्याच्या तब्बल १० तास आधी तुम्ही कॉफी Coffee पिणे थांबवा. कारण कॉफीचा प्रभाव शरीरातून जाण्यास खूप अवधी लागतो. कॉफीतले कॅफीन Caffeine शरीराला उत्तेजित करण्याचे काम करतात. हेच कारण आहे की बहुतेक लोकांना शारीरातील थकवा, सुस्ती दूर करण्यासाठी कॉफी पिणे आवडते.
10 चा अर्थ?
उच्च-कॅफिनयुक्त पेयांमध्ये कॉफी, चहा, ऊर्जा पेये आणि कोलासारखे इतर शीतपेये आहेत. जर तुम्ही रात्री १० वाजता झोपी जात असाल, तर डॉक्टरांच्या या पद्धतीनुसार तुम्ही दुपारी १२ नंतर कॅफीनचे सेवन करणे थांबवावे.
3 चा अर्थ?
10-3-2-1 युक्तीमध्ये ३ म्हणजे झोपेच्या तीन तास आधी जास्त जेवणे बंद करा. त्यांच्या म्हणण्यानुसार असे केल्याने हे छातीत जळण्याची Acidity समस्या दूर करते, ज्यामुळे झोपण्यास कोणतीही अडचण येत नाही. यासह, झोपेच्या तीन तासांपूर्वी दारू Alcohol पिणे देखील थांबावल पाहिजे.
2 चा अर्थ?
10-3-2-1 या पद्धतीमध्ये २ म्हणजे झोपायच्या २ तास आधी तुम्ही तुमच काम करणे थांबवा. डॉक्टर म्हणतात की, यामुळे मेंदूला Brain काही काळ आराम Rest करण्यास वेळ मिळतो. जर तुम्ही झोपायला जाईपर्यंत तुम्ही काम करत राहिलात तर तुम्हाला झोप लागणार नाही.
1 चा अर्थ?
त्याच वेळी, या ट्रिकमध्ये 1 म्हणजे झोपेच्या एक तास आधी मोबाईल Mobile किंवा टीव्ही Tele Vision पाहणे पूर्णपणे बंद करा. बहुतेक लोकांना सवय असते की, ते झोपेपर्यंत चित्रपट पाहत राहतात. डॉक्टर म्हणतात, 'स्क्रीनमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश मेलाटोनिन Melatonin संप्रेरकाचे उत्पादन रोखतो.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.