Tejas Jaan Da Song Out Instagram
मनोरंजन बातम्या

Tejas Song Release: कंगनाच्या 'तेजस'मधील पहिलं गाणं आऊट, अरिजित सिंगच्या आवाजातील 'जान दा' गाण्यानं केलं मंत्रमुग्ध

Jaan Da Song Out: कंगना रनौतच्या 'तेजस' चित्रपटातील 'जान दा' हे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.

Pooja Dange

Kangana Ranaut Movie Tejas First Song Release:

अभिनेत्री कंगना रनौतचा आगामी चित्रपट 'तेजस'चा ट्रेलर ८ ऑक्टोबरला वायू सेना दिनानिमित्त रिलीज करण्याला आला. चित्रपटाच्या दमदार ट्रेलरने आता प्रेक्षकांना थक्क केले. कंगनाची या चित्रपटाची पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.

कंगना रनौतच्या 'तेजस' चित्रपटातील 'जान दा' हे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंगआणि शाश्वत सचदेव यांनी गायले आहे.

कंगना रनौतने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत गाणे रिलीज झाल्याची माहिती दिली आहे. 'है इश्क जैसा आसमान दा' असे कॅप्शन देत कंगनाने हे गाणे शेअर केले आहे.

'जान दा' गाण्यात कंगना रनौतचा फायटर पायलट बनण्याचा प्रवास दाखविण्यात आला आहे. त्यानंतर यशस्वी फायटर पायलट झाल्यानंतरच आनंद देखील या गाण्यात चित्रित करण्यात आला आहे. कंगना रनौत आणि वरून मित्रा यांची केमिस्ट्री देखील दाखविण्यात आली आहे. देशभक्ती आणि प्रेम याचा अप्रतिम मेळ आपल्याला या गाण्यात पाहायला मिळतो.

कंगना रनौत 'तेजस' हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये कंगनाव्यतिरिक्त अंशुल चौहान, भरून मित्रा, आशिष विद्यार्थी, विशाखा नायर मुख्य भूमिका साकारत आहेत.

नुकताच कंगनाचा 'चंद्रमुखी २' हा तामिळ चित्रपट प्रदर्शित झाला. तर इंदिरा गांधी यांच्यावर जीवनावर आधारित 'इमर्जन्सी' चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून कंगना दिग्दर्शन क्षेत्रात पदापर्ण करत आहे.

कंगना रनौत सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान कंगना आज विमातळावर स्पॉट झाली. तेव्हा तिने 'भारत को छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं' है डायलॉग म्हणून दाखवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस, हजर होण्याचे आदेश, नेमकं कारण काय? VIDEO

Onkar Elephant : नदीत अंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर अमानुष हल्ला, अंगावर सुतळी बॉम्ब फेकले अन्...

Actress Journey: योगा टीचरवर पडली डायरेक्टरची नजर, केलं फिल्ममध्ये कास्ट; आज आहे कोट्यवधीची मालकीण

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

Maharashtra Live News Update: निवडणुकीत कोणासोबत युती किंवा आघाडी करायची यासंदर्भात काँग्रेस बुधवारी निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT